scorecardresearch

Oscar Awards 2023: ‘नाटू नाटू’ने जिंकला पुरस्कार; भारताला पहिल्यांदाच गाण्याने मिळवून दिला ऑस्कर

Oscar Awards 2023: ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे.

naatu naatu wins oscar-2023
ऑस्कर २०२३

‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नॉमिनेशन मिळालं होतं आणि आज झालेल्या सोहळ्यात गाण्याने हा पुरस्कार जिंकला आहे. ‘नाटू नाटू’ गाण्याला नॉमिनेशन मिळाल्यानंतर संपूर्ण भारतीय यंदाच्या ऑस्करसाठी उत्सुक होते. पहिल्यांदाच या कॅटेगरीत भारताने ऑस्कर जिंकला आहे. ( ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे लाइव्ह अपडेट्स पाहण्यासाठी इथे क्लिक करा. )

Oscar Awards 2023: भारताच्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने रचला इतिहास; ‘या’ श्रेणीत जिंकला ऑस्कर पुरस्कार

एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटामधील ‘नाटू नाटू’ गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याच्या श्रेणीत ऑस्कर मिळाला आहे. अप्लॉज (टेल इट लाइक अ वुमन), होल्ड माय हँड (टॉप गन मॅव्हरिक), लिफ्ट मी अप (ब्लॅक पाथेर वाकांडा फॉरेव्हर), आणि दिस इज ए लाइफ (एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल अ‍ॅट वन्स) या गाण्यांना मागे टाकत ‘नाटू नाटूने’ ऑस्कर पटकावला.

संगीतकार एमएम किरावानी आणि चंद्रबोस यांनी मंचावर जाऊन ऑस्कर पुरस्कार स्वीकारला. ‘मी कारपेंटर्सना ऐकत मोठा झालो आणि आज माझ्या हातात ऑस्कर पुरस्कार आहे’, असं किरावानी यावेळी म्हणाले.

यावेळी त्यांनी ऑस्कर जिंकल्यावर मंचावर गाणं म्हटलं. किरावानी यांनी ऑस्कर अवॉर्ड स्वीकारल्यानंतर दीपिका पदुकोण भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-03-2023 at 08:35 IST
ताज्या बातम्या