बॉलिवूडचा बजरंगी भाईजान ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांनी या ट्रेलरला चांगलची पसंती दिली आहे. दरम्यान, आता या चित्रपटातलं एक आयटम सॉन्ग प्रदर्शित झालं आहे.

सलमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे आयटम सॉन्ग शेअर केलं आहे. या गाण्याचं नाव चिंगारी असं आहे. वलूचा डिसूजा ही या गाण्यात दिसत आहे. या गाण्याची कोरिऑग्राफी कृति महेशने केले आहे. या गाण्यात प्रेक्षकांना लावणी पाहायला मिळणार आहे. हे गाणं बॉलिवूडची लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान आहे. तर या गाण्याला संगीत बद्ध हितेश मोडक यांनी केले आहे. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं आहे.

आणखी वाचा : “तर निक माझा जीव घेईल…”, प्रियांकाला वाटते पतीची भीती

‘चिंगारी’ आधी ‘अंतिम’ चित्रपटातील ‘विघ्नहर्ता’, ‘मेरे भाई का बर्थडे’ आणि ‘होने लगा’ ही गाणी प्रदर्शित झाली आहेत. ‘होने लगा’ या गाण्यात आयुष शर्मा आणि मगिना मकवाना यांचा रोमान्स पाहायला मिळतं आहे. हे गाणं प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.

आणखी वाचा : “माझी मोलकरीण साडीत तुझ्या पेक्षा चांगली दिसते”, म्हणणाऱ्या नेटकऱ्यावर संतापली स्वरा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘अंतिम’चे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती सलमान खानने केली आहे. तर सलमान या चित्रपटात सरदार पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहे. प्रेक्षक या चित्रपटातीची प्रतिक्षा करत आहेत. हा चित्रपट २६ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.