बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे लाखो चाहते आहेत. सध्या सलमानचे चाहते ‘राधे-युवर मोस्ट वॉन्टेड भाई’ या त्याच्या आगामी चित्रपटाची प्रतिक्षा करत आहेत. मात्र, करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे चित्रपटगृह ही अनेक ठिकाणी बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे सलमानचे चाहते निराश झाले आहेत. मात्र सलमानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.

‘झी स्टुडिओ’जने सगळ्यागोष्टींचा विचार केला. ‘राधे’ हा चित्रपट संपूर्ण जगात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. करोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती पाहता इतर ठिकाणी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ZEEPlex आणि झी५ वर पाहायला मिळणार आहे. सगळ्या लोकप्रिय डीटीएच ऑपरेटर म्हणजेच डिश, डी२एच. टाटा स्काय आणि एअरटेल डिजिटलवर प्रदर्शित होईल.

सलमान खानच्या चित्रपटांसाठी चाहत्यांमध्ये कायमच आतूरता पाहायला मिळते. या चित्रपटात सलमान सोबत अभिनेत्री दिशा पटानी झळकणार आहे. याचसोबत या चित्रपटात रणदीप हुड्डा, जॅकी श्रॉफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रभू देवाने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. तर २२ एप्रिल रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट १३ मे ला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित होणार आहे. एवढंच नाही तर हा चित्रपट ४० देशांमध्ये प्रदर्शित होणार.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येत्या काळात सलमान ‘टाइगर 3’, ‘किक 2’ आणि ‘कभी ‘ईद कभी दीवाली’ या चित्रपटात झळकणार आहे. तसंच किंग खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात सलमान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.