यंदाचे वर्ष संपण्यासाठी अवघा एक दिवस शिल्लक आहे. मात्र त्यातच यंदाचे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी आणखी दु:खद बातमी घेऊन आले आहे. बॉलिवूड चित्रपट निर्माते आणि निर्माते विजय गलानी यांचे बुधवारी निधन झाले. ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विजय गलानी यांचा मृत्यू लंडनमध्ये झाला. काही दिवसांपूर्वीच कर्करोगाच्या उपचारासाठी ते त्या ठिकाणी गेले होते.

विजय गलानी यांनी २०१० मध्ये बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मुख्य भूमिका असलेला ‘वीर’ चित्रपटाची निर्मिती केली होती. फक्त सलमान खान नव्हे तर त्यांनी अक्षय कुमार यांच्यासोबत अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती.

विजय गलानी यांना कर्करोग झाला होता. त्याच्या उपचारासाठी ते लंडनला गेले होते. विजय गलानी यांनी १९९२ मधील ‘सूर्यवंशी’ आणि १९९८ मधील ‘अचानक’ या चित्रपटांसह अनेक हिट चित्रपटांची निर्मिती केली. विजय गलानी यांनी २००१ मध्ये अजनबी या चित्रपटाची देखील निर्मिती केली होती. या चित्रपटात अक्षय कुमार, बॉबी देओल, करीना कपूर आणि बिपाशा बसू यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

सुपरस्टार रजनीकांत यांनी केले रणवीर सिंहच्या ‘83’ चित्रपटाचे कौतुक, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय गलानी यांनी ‘पॉवर’ या चित्रपटाची निर्मिती देखील केली होती. हा चित्रपट जानेवारीमध्ये OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. यात श्रुती हासन, विद्युत जामवाल आणि प्रतीक बब्बर हे कलाकार झळकले होते.