कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ या रिअ‍ॅलिटी शोला खूप लोकप्रियता मिळाली. महेश मांजरेकर यांनी आतापर्यंतच्या तिन्ही पर्वांचे सूत्रसंचालन केले आहे. या शोला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या लोकप्रिय कार्यक्रमाचे चाहते त्याच्या नव्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नव्या पर्वामध्ये महेश मांजरेकरांच्या जागी दुसरा सूत्रसंचालक येणार असल्याचे म्हटले जात होते. पण शोच्या प्रोमोवरुन तेच या पर्वामध्येही सूत्रसंचालन करणार असल्याचे स्पष्ट झाले.

बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाची सुरुवात २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर यांनी सोशल मीडियावर कार्यक्रमाच्या ग्रँड प्रीमिअरची घोषणा केली होती. दरम्यान नव्या पर्वामध्ये कोणते सेलिब्रिटी सहभागी होणार आहेत हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. स्पर्धकांची नावे शोच्या ग्रँड प्रीमिअर जाहीर होणार असली, तरी सध्या सोशल मीडियावर त्याबद्दल खूप चर्चा होत आहे. निर्मात्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यासाठी सिनेसृष्टीतील मोठमोठ्या कलाकारांना विचारले असल्याचे म्हटले जात आहे.

सोशल मीडियावर सुरु असलेल्या चर्चांमध्ये अभिनेता समीर परांजपे याच्या नावाचा सतत उल्लेख होत आहे. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेमध्ये समीर ‘अभिमन्यू’ (अभ्या) हे पात्र साकारत होता. या मालिकेच्या नव्या प्रोमोवरुन कथानक दहा वर्ष पुढे नेले असल्याचे समजत आहे. प्रोमोमध्ये अभिमन्यू आणि लतिका यांच्या मुलीची ओळख करुन दिली आहे. तसेच त्या व्हिडीओमध्ये फक्त लतिका आणि तिची मुलगी दाखवली आहे. मालिकेत झालेल्या या बदलामुळे नेटकऱ्यांनी अनेक तर्क लावले आहेत. काहींनी समीर बिग बॉसमध्ये येणार असे म्हटले आहे. तर काहीजणांनी त्याने बिग बॉसमध्ये भाग घेतल्यामुळे मालिकेमध्ये फार कमी वेळात इतका मोठा बदल केला असल्याची शंका व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – मातृत्वाच्या संवेदनशील विषयाला प्रसाद खांडेकरचा विनोदी तडका; ‘कुर्रर्र’ नाटक ‘या’ दिवशी टीव्हीवर पाहता येणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समीर परांजपे व्यतिरिक्त किरण माने, प्राजक्ता गायकवाड, तेजश्री जाधव, अनिकेत विश्वासराव, तुषार गोसावी हे कलाकार बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात दिसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.