सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्तचा (Sanjay Dutt) आज ६३वा वाढदिवस. संजय दत्तने बॉलिवूडला आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्याच्या चित्रपटांमुळे तो नेहमीच चर्चेत राहिला. पण त्याचबरोबरीने संजयचं खासगी आयुष्यही कोणापासून लपून राहिलेलं नाही. आजवर संजू बाबाचं नाव बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींशी जोडलं गेलं. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित (Madhuri Dixit). संजय आणि माधुरीचं रिलेशनशिप जगजाहिर झालं होतं.

आणखी वाचा – “मला काही झाल्यास नाना पाटेकर जबाबदार” तनुश्री दत्ताची ‘ती’ संतप्त पोस्ट चर्चेत

दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये आकंठ बुडाले होते. पण दरम्यान मुंबईतील १९९३च्या बॉम्बस्फोट प्रकरणात संजय अडकल्यामुळे माधुरी आणि संजूबाबामध्ये दुरावा निर्माण झाला. यादरम्यान संजयची पहिली पत्नी ऋचा शर्मा ब्रेन ट्युमर या आजाराशी झुंज देत होती. या आजारावर उपचार घेण्यासाठी ऋचा तेव्हा अमेरिकेमध्ये राहत होती.

पत्नी आजारी असताना संजय भारतामध्ये त्याच्या चित्रपटांच्या कामामध्ये व्यग्र होता. दिवसेंदिवस ऋचाच्या तब्येत खालावत होती. संजय आणि माधुरीच्या नात्यामध्ये वाढलेली जवळीक आणि त्यांच्या नात्याबाबत ऋचाला समजलं. माधुरी-संजयच्या नात्याबाबत समजताच ऋचा अमेरिकेमधील उपचार सोडून भारतात परतली होती.

आणखी वाचा – Video : तीन वेळा आयव्हीएफ, हाती अपयश अन् गंभीर आजाराचं निदान, अभिनेत्रीला कॅमेऱ्यासमोर अश्रू अनावर 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इतकंच नव्हे तर संजय तेव्हा पत्नी ऋचा आणि मुलगी त्रिशालाला मुंबई विमानतळावरून घेऊन जाण्यासाठीही आला नाही. हे प्रकरण इतकं वाढलं की ऋचा-संजयच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण झाला. संजय आणि ऋचाचं लग्न १९८७ मध्ये झालं. १९९६मध्ये संजयच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं.