बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे सारा अली खान. सारा ही अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी आहे. सारा आणि सैफ यांच्यामध्ये चांगले बाँडिंग असल्याचे पाहायला मिळते. बऱ्याच वेळा चित्रीकरणातून वेळ काढून सारा सैफला भेटायला जाते. फेब्रुवारी महिन्यात सैफची दुसरी पत्नी करीना कपूर खानने दुसऱ्यांदा बाळाला जन्म दिला. सारादेखील शुभेच्छा देण्यासाठी सैफ आणि करीनाच्या घरी गेली होती. सैफ चौथ्यांदा बाबा झाल्यावर साराला आनंद झाला होता. आता साराने एका मुलाखतीमध्ये छोट्या भावाला पाहून तिची काय प्रतिक्रिया होती हे सांगितले आहे.
नुकताच साराने न्यूज १८शी संवाद साधला. त्यावेळी तिने लहान भावाला पहिल्यांदा भेटायला गेली तेव्हाचा अनुभव सांगितला. ‘त्याने माझ्याकडे पाहिले आणि तो हसला. मला ते पाहून आनंद झाला. तो एकदम क्यूट आहे’ असे सारा म्हणाली.
आणखी वाचा : आलिशान बंगला ते लग्झरी कार, इतक्या कोटी रुपयांची मालकीण आहे करीना कपूर खान
View this post on Instagram
पुढे साराने वडील सैफ अली खान ५०व्या वर्षी चौथ्यांदा बाबा झाले त्या विषयी म्हटले की, ‘मी बाबांना चेष्टेत म्हणते की आयुष्यातील प्रत्येक दशकात तुम्हाला मुलं झाले आहे. विशी, तिशी, चाळिशी आणि पन्नाशीतही. हे बाळ त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन आले आहे. मी त्यांच्यासाठी खूप खूश आहे.’
सारा लवकरच ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या पूर्वी तिचा कुली नंबर १ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ती वरुण धवनसोबत दिसली होती.