माणसांचे इमोशन्स बदलायला शब्दच पुरेसे आहेत. याचीच झलक दाखवणारा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.प्रेम प्रकरण आणि लग्न तसेच प्रेयसी आणि बायको यांच्यामध्ये नेमका काय फरक आहे हे अतिशय मजेशीररित्या या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहे. अमोल उतेकर यांची प्रस्तुती, स्टेलारीया स्टुडीयोटी निर्मिती आणि प्रदिप रघुनाथ मेस्त्री यांनी दिग्दर्शित केलेला हा ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटाचा टीझर सोशल मिडीयावर प्रदर्शित झाला आहे.

या टीझरमध्ये प्रेक्षक कलाकार सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, राणी अग्रवाल यांच्या भन्नाट अभिनयाची झलक प्रेक्षकांना पाहता येणार आहे. तसेच आदर्श शिंदेच्या आवाजातील एक नवीन, दमदार गाणं या टीझरमधून ऐकायला मिळाले. त्यामुळे या गाण्याविषयी उत्सुकता नक्कीच वाढली असणार. या टीझरमधला सर्वात आकर्षक आणि मनोरंजक सीन म्हणजे गुरुच्या भूमिकेत असलेल्या महेश मांजरेकर यांचा अभिनय आणि संवाद.

 

लाईफ एन्जॉय करायला शिका नाही तर ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ असं सांगू इच्छिणा-या चित्रपटात कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत, गौरव मोरे या कलाकारांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. नवीन वर्षात हा धमाकेदार आणि मजेशीर विनोदी चित्रपट महाराष्ट्राचे मनापासून मनोरंजन करणार आहे. ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ चित्रपटाची कथा प्रदिप मेस्त्री यांनी लिहिली असून हा चित्रपट ११ जानेवारीला प्रदर्शित होत आहे.