सुहानाच्या बिकनी फोटोवर शाहरुखची संतप्त प्रतिक्रिया

तिच्याऐवजी दुसरं कोणीही नग्न अवस्थेत दिसल असतं तरी त्याची बातमी झाली नसती

सेलेब्रिटी म्हटलं की स्टारडम येतंच पण त्याचसोबत या सेलेब्रिटींच्या कुटुंबियांना त्याचा फटकाही बसत असतो. या लोकांची अगदी छोट्यातली छोटी गोष्टही व्हायरल होण्यास वेळ लागत नाही. त्यांचे खासगी आयुष्य हे अजिबात त्यांच्यापुरते मर्यादित राहत नाही. असेच काहीसे बॉलीवूड बादशहा शाहरुख खानच्या मुलांसोबत होत आहे. शाहरुखच्या प्रसिद्धीने जितके प्रेम या मुलांना मिळाले आहे तितकाच त्याचा फटकाही या मुलांना बसल्याचे चित्र काही दिवसांपूर्वी दिसले.
काही दिवसांपूर्वी शाहरुखची मुलगी सुहाना हिचा बिकनीतील फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. प्रसारमाध्यमांनीही या गोष्टीस बरेच उचलून धरले होते. त्यामुळे त्याच्या स्टारडमचा फटका हा आपल्या मुलांना बसत असल्याची खंत शाहरुखने बोलून दाखवली. माध्यमांनी नको त्या प्रकारे सुहानाच्या फोटोची प्रसिद्धी केल्याने या घटनेचा शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाने कसा सामना केला याबाबतचा खुलासा नुकताच त्याने केला. एका मुलाखतीदरम्यान शाहरुख म्हणाला की, तिने बिकनी घातली होती आणि ती तिच्या छोट्या भावासोबत समुद्रावर गेलेली. पण या छोट्याशा गोष्टीला तुम्ही अधिक हवा देऊन त्याची वाईट पद्धतीने प्रसिद्धी केली. ती तिच्या लहान भावासोबत होती हे न बघता तिने बिकनी घातलेली यावर तुम्ही लक्ष केंद्रीत करून नको त्या हेडलाइन्स तयार केल्या. हे चुकीचं नाहीए का? मला तरी हे चुकीचेच वाटते, असे शाहरुख म्हणाला.
हा सर्व प्रकार नियंत्रणात आणण्यासाठी शाहरुख नंतर त्या संकेतस्थळांपर्यंत जाऊन पोहचला. याविषयी बोलताना तो म्हणाला की, या सर्व प्रकाराने माझी मुलगी बिथरली होती. मित्रांनो, ती फक्त १६ वर्षांची आहे. काही संकेतस्थळांनी तर  हेडिंगमध्ये ‘वाव’ असेही म्हटले होते. मी सुहानाला प्रसारमाध्यमांपासून वाचवत नसून तिचा माझ्यापासूनच बचाव करतोय. माझ्या स्टारडममुळे त्या फोटोवर बातम्या केल्या गेल्या. जर ती शाहरुखची मुलगी नसती तर असे झालेच नसते. तिच्याऐवजी दुसरं कोणीही नग्न अवस्थेत दिसल असतं तरी त्याची बातमी झाली नसती, या शब्दात शाहरुखने माध्यमांची कानउघाडणी केली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shah rukh khan on suhanas bikini clad pic i was protecting her from me not media

ताज्या बातम्या