बॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत यांनी काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला. नुकतंच या चिमुकलीचे ‘मिशा’ असे नाव ठेवण्यात आलं आहे. मीराचा ‘मि’ आणि शाहिदचा ‘शा’ ही आद्याक्षर एकत्र करुन हे नाव ठेवण्यात आलं आहे. तसेच या नावाचा अर्थ ‘देवासमान’ असाही होतो.
आपल्या लेकीचे नाव सांगताना एक सुंदर ट्विट शाहिदने सोमवारी केले होते. ‘मिशा कपूरने बाबांना कुठेही जाणं अशक्य केलं आहे’. तसेच यास #obsesseddaddylife असा हॅशटॅग दिला आहे. शाहिद-मीरा यांच्या नावांचा मिलाफ साधत हे नाव ठेवण्यात आलं आहे. शाहिद आणि मीराच्या घरी २६ ऑगस्टला परिराणीचे स्वागत करण्यात आले. आपल्या बाळाच्या आगमनाची बातमी देताना शाहिदने ट्विट केलेले की, ती आली आहे आणि आमचा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दही कमी पडत आहेत. सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. याआधी अभिनेत्री राणी मुखर्जी आणि निर्माता -दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांनी आपल्या मुलीचे नाव ‘आदिरा’ असेल ठेवले. आदित्य आणि राणी यांच्या आद्याक्षरांचा मिलाफ करून हे नाव ठेवण्यात आले होते.
शाहिदच्या मुलीच्या नावाविषयी माहिती घेण्यासाठी इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉमने त्याच्या आईशी म्हणजेच अभिनेत्री निलीमा आझिम यांच्याशी संपर्क साधला होता. तेव्हा त्या म्हणालेल्या की, सध्या तरी मी या बातमीला दुजोरा देऊ शकत नाही. तसेच यास नाकारतही नाही. तिच्या आई-वडिलांचा हा अधिकार असून योग्य वेळ येईल तेव्हा तेच बाळाचे नाव जाहीर करतील. त्यानंतर शाहिदने केलेल्या एका ट्विटने त्याच्या चिमुकलीच्या नावावर मोहोर लावली.
Misha Kapoor makes it impossible for daddy to go anywhere.#obsesseddaddylife
— Shahid Kapoor (@shahidkapoor) September 19, 2016
सध्या नवा बाबा म्हणजेच शाहिद आपल्या या नव्या आयुष्याचा आनंद घेत असून त्याने कामातून सुट्टी घेतली आहे. दिग्दर्शक संजय लीला भन्सालीच्या ‘पद्मावती’ या चित्रपटाने तो कामाची सुरुवात करेल. तसेच त्याने विशाल भारद्वाजच्या ‘रंगून’ या चित्रपटाचेही काम पूर्ण केले आहे. या चित्रपटात कंगना रणौत आणि सैफ अली खान यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
A photo posted by Shahid Kapoor (@shahidkapoor) on
Happy first anniversary my love. @mira.kapoor you are my sunshine.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.