शक्तिमान ही मालिका प्रेक्षकांच्या लक्षात असलेली मालिका आहे. या मालिकेत आपण मुकेश खन्ना यांना शक्तिमानच्या भूमिकेत पाहिलं आहे. या मालिकेत मुकेश यांच्यासोबत वैष्णवी महंत या गीता विश्वासच्या भूमिकेत दिसल्या. वैष्णवी या त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. अभिनय क्षेत्रात जर तुम्ही अनेक वर्षे काम केलं आहे आणि तरी लोक तुम्हाला नावाने ओळखत नाही तर याहून अपमान कोणताच नसतो. असेच काही तरी वैष्णवी यांच्यासोबत झाले याविषयी स्वत: वैष्णवी यांनी सांगितलं आहे.

वैष्णवी महंत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी त्यांच्या अपमानाविषयी सांगितले आहे. मुंबईत झालेल्या ग्लोबल अचीवर्स अवॉर्ड कार्यक्रमात वैष्णवी यांना बोलावण्यात आले होते. फक्त छोट्या पडद्यावर नाही तर अनेक चित्रपटांमध्ये काम केलेल्या वैष्णवी यांना या अवॉर्ड शोमध्ये चुकीच्या नावाने बोलावण्यात येत होते.

आणखी वाचा : कोटींच्या संपत्तीचा मालक असलेला अंकिताचा पती काय काम करतो माहिती आहे का?

वैष्णवी यांनी याविषयी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत सांगितले आहे. त्यांनी सांगितलं की त्यांना मुंबई ग्लोबर अचीवर्स अवॉर्ड २०२१ मध्ये बेस्ट अॅक्ट्रेस फॉरएवर देण्यासाठी बोलावण्यात आले होते. मी वेळेत पोहोचले. स्टेजवर जेव्हा मला अवॉर्ड देण्याची वेळ आली तेव्हा सृष्टी माहेश्वरी सोबत माझं नाव घेण्यात आलं होतं. पण ते माझ्या जागेवर वंदना श्रीवास्तव हे नाव घेत होते. मला वाटलं कोणी वंदना असेल. पण हे एक-दोनदा नाही तर तीन-चार वेळा झालं, पण कोणी वंदना स्टेजवर पोहोचली नाही.

आणखी वाचा : ‘गहराइयां’च्या टीझर पेक्षा दीपिकाचा किस आणि बिकिनी चर्चेत!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वैष्णवी पुढे म्हणाल्या, “ते वंदना हे नाव घेत माझ्याकडे बघत होते. त्यानंतर बरेच सेलिब्रिटीपुढे आले आणि त्यांनी माझं नाव घेतलं वैष्णवी…वैष्णवी…वैष्णवी…तरी देखील ते लोक वंदना हेच नाव बोलत होते. हे माझ्यासाठी अपमानास्पद होतं. ऑर्गेनाझरने मला बोलावल्यानंतर मी स्टेजवर गेली पण मी अवॉर्ड घेण्यास नकार दिला. जर तुम्हाला नाव नाही माहित तर मी हा अवॉर्ड नाही घेऊ शकतं. जर तुम्ही माझं नाव वंदना घेत आहात तर काय माहित त्या अवॉर्डवर पण माझं नाव वंदना असेल. मी परत आले, कारण मला वाटले की माझ्या आत्मसन्मानापेक्षा कोणती गोष्ट मोठी नाही.”