बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. शिल्पा सोशल मीडियावर चर्चेत असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. आज करवा चौथ निमित्ताने शिल्पाने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

शिल्पाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत शिल्पाने करवा चौथ निमित्ताने मिळालेली सरगी दाखवली आहे. सोबतच सगळ्यांना करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.राज कुंद्रा पॉर्न प्रकरणानंतर आता शिल्पाने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांना धक्का बसला आहे.

आणखी वाचा : “हिंदू धर्माच्या सणावेळीच ज्ञान का देता….” ; ‘त्या’ पोस्टमुळे रितेश देशमुख झाला ट्रोल

आणखी वाचा : “एक आई आपल्या मुलाला…”, मलायकासोबतचा रोमँटिक फोटो शेअर केल्यामुळे अर्जुन झाला ट्रोल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी शिल्पाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओत शिल्पाने तिच्या हेअर कट केल्याचे दिसत आहे. केस बांधत असतानाच शिल्पाचा नवा हेअर कट दिसून येतोय. हा हेअर कट ‘अंडरकट बझ कट’ आहे.