Son Of Sardaar 2 First Poster : १३ वर्षांची प्रतीक्षा आता संपणार आहे. २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सन ऑफ सरदार’चा सिक्वेल आता प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे.
अजय देवगणच्या या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे आणि प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. पुढील महिन्यात हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालण्यासाठी येत आहे.
अजय देवगणच्या बहुप्रतीक्षित ‘सन ऑफ सरदार २’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आहे. पोस्टरमध्ये अजय देवगण पगडी घातलेल्या सरदाराच्या लूकमध्ये दिसत आहे. तो दोन टँकरवर उभा आहे. चित्रपटाची रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे.
पोस्टरमध्ये काय आहे?
‘सन ऑफ सरदार २’च्या नवीन पोस्टरमध्ये अजय देवगण पिवळ्या रंगाची पगडी घालून अॅक्शनमध्ये उभा असल्याचे दिसून येते. त्याने पँट आणि टी-शर्ट घातले आहे. वर त्याने काळे जॅकेट घातले आहे. पोस्टरवर ‘सन ऑफ सरदार २’ लिहिले आहे. त्याची टॅग लाईन ‘द रिटर्न ऑफ द सरदार’ आहे. पोस्टरमध्ये त्याची रिलीज डेटदेखील लिहिली आहे.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
‘सन ऑफ सरदार २’मध्ये अजय देवगण आणि मृणाल ठाकूर महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. अजय देवगण पुन्हा एकदा चित्रपटात जस्सीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कुमार अरोरा करत आहेत. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण करत आहे. नवीन पोस्टरनुसार, ‘सन ऑफ सरदार २’ २५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘सन ऑफ सरदार’ हा चित्रपट २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. अजय देवगण व्यतिरिक्त या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा आणि संजय दत्तदेखील होते. चित्रपटात असे दाखवण्यात आले होते की अजय देवगण सोनाक्षीच्या प्रेमात पडतो, पण सोनाक्षीचा भाऊ संजय दत्त या नात्याला विरोध करतो. चित्रपटाची कथा याचभोवती फिरते. चित्रपटाचे बजेट ३० कोटी रुपये होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १६१.४८ कोटी रुपये कमावले होते.