Sonam Kapoor Blessed with Baby Boy : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर गेल्या काही महिन्यांपासून तिच्या गरोदरपणामुळे चर्चेत आहे. लग्नानंतर चार वर्षांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली. काही दिवसांपूर्वीच सोनमने बाळाला जन्म दिल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं उघडकीस आलं. पण आता स्वतः सोनमनेच एक खास पोस्ट शेअर करत आपल्या घरी गोंडस बाळाचं आगमन झालं असल्याचं सांगितलं आहे.

आणखी वाचा – नितीन गडकरींनी घेतली अमिताभ बच्चन यांची भेट, व्हायरल फोटोंमधील एका गोष्टीने वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

सोनमने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सोनमनेच इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. ती पोस्ट करत म्हणाली, “२० ऑगस्ट २०२२ रोजी आमच्या घरी एका गोंडस मुलाचं आगमन झालं आहे. डॉक्टर्स, नर्स, मित्र परिवार आणि कुटुंबियांचे मनापासून आभार. माझ्या संपूर्ण प्रवासामध्ये या सगळ्यांनी मला पाठिंबा दिला. ही फक्त सुरुवात आहे. पण आम्हाला माहित आहे की आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे.”

View this post on Instagram

A post shared by Sonam A Kapoor (@sonamkapoor)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नीतू कपूर यांनी देखील खास पोस्ट शेअर करत अनिल कपूर आणि सोनम कपूरला शुभेच्छा दिल्या आहेत. सोनमने देखील पोस्ट शेअर केल्यानंतर आनंद आहुजा आणि तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच कपूर कुटुंबिय सध्या हा आनंद सेलिब्रेट करताना दिसत आहेत. अनिल कपूर यांनी आपल्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं असल्याचं म्हणत आनंद व्यक्त केला आहे.

सोनम कपूरने २०१८ मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधली होती. लग्नानंतर चार वर्षांनी तिने आई होणार असल्याची गुडन्यूज दिली आहे. परदेशात सोनमचा डोहाळे जेवणाचे कार्यक्रम थाटामाटात पार पडला होता. आता सोनम-आनंदच्या आयुष्याला नव्याने सुरुवात झाली आहे.