बॉलिवूड गायक सोनू निगम हा लोकप्रिय गायकांपैकी एक आहे. सोनूचे लाखो चाहते आहेत. सोनू हा फक्त चित्रपटातचं गाणी गात नाही तर लाइव्ह परफॉर्मन्सही करतो. परदेशातही तो अनेक शो करतो. सध्या सोनू एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. त्याला धमक्या दिल्यात जात असल्याचं त्याने सांगितले आहे. मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचे चुलत भाऊ राजिंदर सिंग यांनी सोनूला ही धमकी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी त्यांचा चुलत भाऊ राजिंदर सिंगला सोनू निगमची ओळख करून दिली होती. त्यानंतर राजिंदरने सोनूला परदेशात एका संगीत कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करण्यास सांगितले.

आणखी वाचा : ‘हा’ लोकप्रिय अभिनेता साकारणार ‘शक्तिमान’ ही भूमिका

सोनूचा इंटरनॅशनल कॉन्सर्ट त्याचा प्रमोटर रॉकी पाहत असल्याने त्याने राजिंदर यांना रॉकीशी संपर्क साधण्यास सांगितले. राजिंदर यांना याचे वाईट वाटले आणि त्यांनी सोनूचा अपमान करणारे अनेक मेसेज पाठवले. त्याला धमक्याही दिल्या.

आणखी वाचा : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या नवीन बंगल्या पेक्षा चर्चा रंगली बाथरूमची, जाणून घ्या कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असे सांगण्यात येत आहे की सोनू निगमला राजिंदर यांना हे जे मेसेक पाठवले आहेत. त्या मेसेजमध्ये असभ्य भाषा होती. त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. पण, सोनूला या प्रकरणात कोणतीही कारवाई करायची नाही. त्याच कारण म्हणजे सोनू इकबाल आणि त्यांनी मुंबईत जे काम केले आहे त्याचा सन्मान करतो आणि यामुळेच तो राजिंदर यांच्या विरोधात कोणतीही कठोर कारवाई करणार नाही.