सर्वसामान्यांना बळ देणारा अभिनेता सोनू सूद करोना पॉझिटिव्ह

सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती..

sonu sood,

राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा उपद्रव झाल्यानंतर मोठ्या संख्येनं रुग्णवाढ झाली. सामान्य माणासांपासून ते अनेक कलाकारांपर्यंत करोनाची लागण झाल्याचे समोर आले. आता अभिनेता सोनू सूदला करोनाची लागण झाली आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे सोनू सूदने करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.

सोनू सूदने ट्विटर अकाऊंटवर पोस्ट शेअर केली आहे. ‘नमस्कार मित्रांनो, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वत:ला क्वारंटाइन केले आहे. चिंतेचे कोणतेही कारण नाही. उलट आता तुमच्या समस्या दूर करण्यासाठी माझ्याकडे पहिलेपेक्षा जास्त वेळ आहे. लक्षात ठेवा, कोणतीही समस्या असली, तरी मी तुमच्यासोबत आहे’ या आशयाचे ट्वीट त्याने केले आहे.

आणखी वाचा: ‘मी तुमच्या विरोधात केस करेन’, हॉट फोटो पाहून म्हणणाऱ्याला हिना खानचे भन्नाट उत्तर

बॉलिवूड चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू सूद खऱ्या आयुष्यात मात्र अनेकांसाठी सुपरहिरो ठरला आहे. त्याने लॉकडाउनच्या काळात अनेकांना मदत केली होती. काही स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली तर काही बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. तसेच त्याने परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत येण्यास मदत केली होती.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकरांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. अभिनेत्री आलिया भट्ट, रणबीर कपूर, विकी कौशल, कतरिना कैफ, विक्रांत मेसी, गोविंदा यांना करोनाची लागण झाली होती. आता सोनू सूदची देखील करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Sonu sood tests positive for covid19 avb

ताज्या बातम्या