‘सूर्यवंशी’ चित्रपटाच्या ‘नाजा’ या नव्या गाण्याचा टीझर रिलीज!

अक्षय आणि कतरिना यांचा रोमान्स यात पाहायला मिळणार आहे.

sooryavanshi-najaa-song-akshay-kumar-katrina-kaif
हे पार्टी सॉन्ग उद्या प्रदर्शित होणार आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि कतरिन कैफ यांचा बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. पण आता अखेर ५ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षयने सोशल मीडियावर काही वेळा पूर्वी रोहित शेट्टीसोबत ‘जय-वीरू’ मोमेंट रिक्रिएट करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.

ही पोस्ट शेअर करत अक्षयने ‘सूर्यवंशी’ या चित्रपटातलं नव्या गाण्याची एक झलक प्रेक्षकांना दिली आहे. अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही या गाण्याचा टीझर शेअर केला आहे. या गाण्यात कतरिना कैफ आणि अक्षय दिसत आहेत. याचं संपूर्ण गाणं हे उद्या 3 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या गाण्याचं नाव ना जा असे आहे. हा टीझर शेअर करत “या गाण्याची रिधम ऐकली तर तुम्ही सुद्धा डान्स कराल”, हे गाणं उद्या प्रदर्शित होणार, असे कॅप्शन अक्षयने दिले आहे. हे एक पार्टी गाणं आहे.

आणखी वाचा : ऐश्वर्याच्या ४८ व्या वाढदिवसाच्या बर्थडेपार्टीतील फोटो व्हायरल

Photo : ‘मुळशी पॅटर्न’चे चाहते जेव्हा ‘अंतिम’चा ट्रेलर बघतात तेव्हा…, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

या गाण्याला संगीर बद्ध हे तनिष्क बागची यांनी केले आहे. तर पाव धरिया आणि निकिता गांधीने गायले आहे. या आधी अक्षय आणि कतरिनाचे रोमॅन्टिक गाणं ‘मेरे यार’ हे आधिच प्रदर्शित झालं आहे. हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं.

दरम्यान, अक्षय आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात रणवीर सिंह आणि अजय देवगन यांनी पाहूण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित शेट्टीने केले आहे. हा चित्रपट रोहित शेट्टीच्या कॉप यूनीवर्स फ्रेंचायझीमधील तिसरा पार्ट आहे. या आधी ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न’ प्रदर्शित झाला होता. यात अजय देवगन मुख्य भूमिकेत होता. तर ‘सिंबा’ हा रणवीर सिंगचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात रणवीर मुख्य भूमिकेत दिसला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sooryavanshi songs na jaa teaser released akshay kumar and katrina kaif dcp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या