रेखा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येते ती तिची ‘इन आँखो की मस्ती के…’ या गाण्यात दिसणारी तिची नजाकत. ‘उमराव जान’ सिनेमातलं हे अजरामर गाणं आपल्या मनात कोरलं गेलं आहे ते रेखामुळेच. आपल्या अभिनयाने हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या रेखाची आठवण आज होण्याचं कारण आहे आज तिचा जन्मदिवस. रेखाच्या बाबतीत एक गोष्ट कायमच बोलली गेली.. ती म्हणजे रेखा एखाद्या ‘ओल्ड वाईन’सारखी आहे. ‘ओल्ड वाईन’ जितकी जुनी होत जाते तितकी ती तरुण असते. रेखाच्या बाबतीत ही बाब तितकीच खरी आहे. १० ऑक्टोबर १९५४ ही रेखाची जन्मतारीख. आज रेखा ६९ वर्षांची झाली आहे. पण तिच्याकडे पाहिलं तर तिच्या वयाचा अंदाज येत नाही इतकं तिने स्वतःला फिट अँड फाईन ठेवलं आहे.

रेखा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो तिचा रेखीव चेहरा. सुरुवातीला तिला सिनेमांमध्ये आणलं गेलं ते ‘सेक्स बॉम्ब’ म्हणून. पण तिची ही प्रतिमा तिने आपल्या सशक्त अभिनयाने तिने पुसली. हिंदी सिनेसृष्टीत असं करणं सहसा कुणाला फारसं जमत नाही, पण रेखाने ते करुन दाखवलं. १९५४ मध्ये आजच्याच दिवशी जन्मलेल्या रेखाचं नाव आहे रेखा गणेशन. सिनेमा तिच्या घरातच होता असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही. कारण तिचे वडील जेमिनी गणेशन आणि आई पुष्पावल्ली हे दोघंही सिने कलाकार होते. रेखाचं नाव रेखा गणेशन असलं तरीही तिने हे आडनाव कधीही लावलं नाही. कारण रेखाचा जन्म झाला तेव्हा जेमिनी गणेशन आणि पुष्पावल्ली यांचं लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे जेमिनी यांनी कधीच आपलं आडनाव रेखाला दिलं नाही आणि तिने ते पुढे लावलंही नाही.

Eid al-Adha (Bakrid
बकरी ईदच्या दिवशी जैन व्यक्तीनं मुस्लीम वेश परिधान करून १२४ बकऱ्या केल्या खरेदी; पण कशासाठी? वाचा नेमकं घडलं काय?
lokmanas
लोकमानस: ‘काजव्यां’ना यापुढेही जागे राहावे लागेल..
Gram Panchayat sarpanch to MLA and now MP Nilesh Lanke is newly elected MP of NCP Sharad Pawar group
ओळख नवीन खासदारांची : नीलेश लंके (नगर-राष्ट्रवादी शरद पवार गट) – अंगी नाना कळा!
vaishakh amavasya 2024
Vaishakh Amavasya 2024 : वैशाख अमावस्येच्या दिवशी शुभ संयोग, ‘या’ पाच राशींवर होणार देवी लक्ष्‍मीची कृपा
This compiled edited part of the introduction to the book Shivarajyabhishek published on the 350th anniversary of Shiva Rajyabhishek
शिवराज्याभिषेकाला लोकमान्यांचे प्राधान्य!
Uddhav Thackeray Party symbol lok sabha Election 2024
‘असली’ कोण; ‘नकली’ कोण…!
sheet metal on Nashik Municipal Corporations signboards in dangerous condition
नाशिक महानगरपालिकेच्या पथदर्शक फलकावरील पत्रे धोकादायक स्थितीत, गडकरी चौकात पत्रे कोसळले
meditation, Kanyakumari rock memorial, prime minister narendra modi
मोदींच्या नव्या ध्यानमग्न छायाचित्राच्या प्रतीक्षेत…

बालपण संघर्षात

रेखाचं बालपण संघर्षात गेलं. कारण तिच्या आईला म्हणजेच पुष्पावल्ली यांना जुगाराची सवय लागली होती. त्यामुळे त्यांना बरंच कर्ज झालं. अखेर रेखाला जबाबदारी घ्यावी लागली आणि घर चालवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागला. खरंतर रेखाचं स्वप्न होतं की आपण एअर होस्टेस व्हावं. तिला एअर होस्टेस होऊन जग फिरायचं होतं. पण तिचं ते स्वप्न अपूर्ण राहिलं. कारण अभिनेत्री होऊन तिने सिनेमात काम करायला सुरुवात केली. कमी वयातच रेखा पैसे मिळवू लागली होती. त्यामुळे तिचं शिक्षण सुटलं. अगदी सुरुवातीच्या काळात रेखाने बी ग्रेड आणि सी ग्रेड सिनेमांमध्येही कामं केली. प्रचंड मेहनत करुन रेखाने आपलं असं एक स्थान सिनेसृष्टीत मिळवलं आहे.

Actress Rekha
रेखाचं आयुष्य बरंच संघर्षमयी, फोटो सौजन्य फेसबुक पेज, रेखा

रेखाने स्मिता पाटीलसाठी केलं डबिंग

रेखा एक उत्तम अभिनेत्री तर आहेच. पण त्याशिवाय तिला मिमिक्रीही खूप चांगली करता येते. तसंच ‘खुबसुरत’ या सिनेमात रेखाने एक गाणंही गायलं आहे. नीतू सिंग म्हणजेच आत्ताची नीतू कपूर आणि स्मिता पाटील या दोन अभिनेत्रींसाठी रेखाने डबिंगही केलं आहे.

‘अंजाना सफर’ आणि किसिंग सीनचा वाद

अभिनेत्री रेखाने १९६९ मध्ये वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी तिच्यापेक्षा २५ वर्षांनी मोठ्या असलेल्या विश्वजीत यांच्यासह एक किसिंग सीन दिला होता. सिनेमाच्या स्क्रिप्टची डिमांड आहे हे सांगितलं गेलं आणि तिला या सीनसाठी तयार करण्यात आलं. या सिनेमात पाच मिनिटांचा किसिंग सीन रेखाने केला. त्यानंतर यावरुन बराच वाद झाला होता. ‘अंजाना सफर’ हा सिनेमा दहा वर्षे सेन्सॉरच्या कात्रीत अडकला होता. त्यातून किसिंग सीन हटवण्याची मागणी होत होती. या किसिंग सीन वरुन झालेला वाद इतका मोठा होता की सेन्सॉरने या सिनेमातून किसिंग सीन काढून टाकायला सांगितलं होतं. त्यानंतर १० वर्षांनी हा सिनेमा ‘दो शिकारी’ या नव्या नावाने रिलिज करण्यात आला. कुलजीत पाल दिग्दर्शित हा सिनेमा चांगलाच चर्चेत राहिला होता. रेखाच्या आयुष्यात पुढेही अनेक वाद झाले होते.

विनोद मेहराशी सिक्रेट लग्न?

अभिनेता विनोद मेहरा आणि रेखा हे दोघे ‘घर’ सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यानंतर या दोघांनीही लग्न केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र अभिनेत्री रेखाने ही अफवा असल्याचं नंतर सांगितलं. १९९० च्या दरम्यान म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्याबरोबरचं अफेअर तुटल्याच्या आल्याच्या बातम्यांनंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यानंतर रेखाने १९९० मध्ये दिल्लीचे बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं. मात्र त्यांनी आत्महत्या केली. रेखाच्या पतीने केलेली आत्महत्या हा देखील बराच काळ चर्चेत राहिलेला विषय होता.

अमिताभसह या अभिनेत्यांशी जोडलं गेलं नाव

रेखाचं नाव दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह राज बब्बर, विनोद मेहरा, जितेंद्र, किरण कुमार, अक्षय कुमार आणि संजय दत्त यांच्याशीही जोडलं गेलं आहे.

खिलाडींयो के खिलाडी सिनेमातलं ते वादग्रस्त गाणं

१९९६ मध्ये आलेल्या ‘खिलाडींयोका खिलाडी’ या सिनेमात In the Night No Control हे गाणं होतं. ज्यामुळे बराच वाद त्या काळी निर्माण झाला होता. २९ वर्षांचा अक्षय कुमार आणि ४२ वर्षांची रेखा यांचा बाथरुम सीन सिनेमात दाखवण्यात आला होता. या सिनेमात रेखाने निगेटिव्ह भूमिका साकारली होती. मात्र हे गाणं आणि त्यातली इंटमसी यामुळे रेखा आणि अक्षय कुमार एकमेकांना डेट करत आहेत अशाही चर्चा रंगल्या होत्या.

‘खून भरी मांग’ आणि ‘उमराव जान’ हे महत्त्वाचे टप्पे

‘खून भरी मांग’ आणि ‘उमराव जान’ या दोन सिनेमांनी रेखाच्या करिअरला वेगळं वळण दिलं. या दोन सिनेमांमुळे ती स्टार झाली. अमिताभ बच्चन यांच्यासह तिने जे चित्रपट केले त्यातला एकही सिनेमा फ्लॉप झाला नाही. अमिताभ आणि रेखा यांची जोडी प्रेक्षकांना खूपच भावली होती. अमिताभ बच्चन यांचा विवाह १९७३ मध्येच जया भादुरींशी झाला होता. मात्र सिनेसृष्टीत आजही चर्चा होते ती अमिताभ आणि रेखा यांच्या अफेअरची. एवढंच काय अनेक लाइव्ह कॉन्सर्ट आणि अवॉर्ड शोमध्ये अमिताभ यांच्याविषयीचं गाणं लागलं तर रेखाचा क्लोज शॉट दाखवला जातो आणि रेखा स्टेजवर असेल तर अमिताभ यांचे हावभाव काय आहेत हे कॅमेरा टिपतो. या दोघांची केमिस्ट्रीच तितकी भन्नाट होती.

rekha talk about her relationship with amitabh bachchan
रेखाने अमिताभ बच्चन यांचं नाव न घेता दिली होती प्रेमाची कबुली

‘सिलसिला’ ठरला अमिताभ आणि रेखाचा शेवटचा सिनेमा

अमिताभ आणि रेखाच्या जोडीने ‘दो अंजाने’, ‘आलाप’, ‘इमान धरम’, ‘खून पसीना’, ‘कस्मे वादे’, ‘मुक्कदर का सिकंदर’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘सुहाग’, ‘राम-बलराम’ आणि ‘सिलसिला’ या सिनेमांमध्ये काम केलं. हे सगळे चित्रपट तिकिटबारीवर पैसावसुल ठरले. तसंच प्रेक्षकांनाही त्यांची जोडी प्रचंड आवडली. सिलसिला या सिनेमात दाखवण्यात आलेली गोष्ट ही अमिताभ आणि रेखाच्या नात्यावरच होती असंही तेव्हा बोललं गेलं होतं. तसंच अमिताभ यांना त्यांच्या वडिलांनी रेखाबरोबर परत काम न करण्याचा सल्ला दिला होता असंही सांगितलं जातं. त्यात कितपत सत्य आहे हे ठाऊक नाही. पण एकामागोमाग एक हिट सिनेमा देणाऱ्या या जोडीचा १९८१ मध्ये आलेला सिलसिला हा सिनेमा शेवटचा सिनेमा ठरला. यानंतर दोघांनी एकत्र एकाही सिनेमांत काम केलं नाही. रेखाशी अमिताभ यांची वाढणारी जवळीक आणि त्यानंतर तयार होणाऱ्या बातम्या या जया बच्चन यांना प्रचंड प्रमाणात खटकल्या होत्या असंही त्यावेळी बोललं गेलं.

रेखाने केलं दिग्गजांबरोबर काम

रेखा ही अशी अभिनेत्री होती जिने अमिताभच नाही तर अनेक दिग्गज नटांबरोबर काम केलं. शशी कपूर, विनोद खन्ना, विनोद मेहरा, संजीव कुमार, रजनीकांत यांच्यासह ती झळकली. रजनीकांत आणि रेखाचा ‘फुल बने अंगारे’ हा सिनेमाही विशेष गाजला होता. तसंच ‘कलयुग’, ‘लज्जा’, ‘इजाजत’ यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमांमध्येही रेखाने तिच्या अभिनयाची छाप सोडली.

वादग्रस्त चित्रपट

‘खिलाडीयोंके खिलाडी’ हा सिनेमा जसा एका गाण्यामुळे वादग्रस्त ठरला तसाच रेखाचा ‘आस्था’ हा सिनेमाही वादग्रस्त ठरला होता. ओम पुरी आणि नवीन निश्चल यांच्यासह रेखाने जे बोल्ड बेड सीन दिले त्यामुळे या चित्रपटाची चर्चा खूप मोठ्या प्रमाणावर झाली होती. १९९६ मध्ये आलेल्या ‘कामसूत्र अ टेल ऑफ लव्ह’ या सिनेमात रेखाने रसा देवी ही कामक्रीडा शिकवणारी शिक्षिका साकारली होती. मीरा नायर दिग्दर्शित हा सिनेमा तर त्यावेळच्या भारतीय प्रेक्षकांची झोप उडवणारा ठरला. तसंच ‘उत्सव’ या सिनेमातही रेखाने अभिनेता शेखर सुमनसह बोल्ड सीन दिले होते. त्यांचीही बरीच चर्चा झाली. तर ‘मन क्यूँ बहका रे बहका आधी रात को’ हे गाणं सुपरहिट ठरलं.

दिलीप कुमार यांच्या शेवटच्या सिनेमात रेखा

यानंतर १९९८ मध्ये दिलीप कुमार यांचा शेवटचा सिनेमा किला रिलिज झाला. या सिनेमातही रेखा होती. यामिनी हे पात्र रेखाने साकारलं होतं. या सिनेमात चित्रित करण्यात आलेला एक बलात्काराचा प्रसंगही त्यावेळी वादाचा विषय ठरला होता. या सिनेमानंतर रेखा बऱ्यापैकी चरित्र भूमिकांकडे वळल्याचं दिसून येतं. तसंच एक उल्लेख आवर्जून करावा लागेल तो म्हणजे ‘धर्मात्मा’ या सिनेमाचा. फिरोज खानसह रेखा या सिनेमात झळकली. ‘क्या खुब लगती हो बडी सुंदर दिखती हो..’ हे त्यातलं गाणं त्यानंतर घडणारे प्रसंग हे सगळंच सुपरडुपर हिट होतं.

२००० मध्ये आलेल्या ‘बुलंदी’ सिनेमात रेखाने अनिल कपूर आणि रजनीकांत यांच्यासह काम केलं. ‘कोई मिल गया’ सिनेमात रेखाने साकारलेली आईची भूमिकाही विशेष गाजली. तसंच ‘परिणीता’ या सिनेमात त्यांच्यावर चित्रित झालेलं ‘कैसी पहेली जिंदगानी’ हे गाणंही गाजलं. धर्मेंद्र यांच्या ‘यमला पगला दिवाना’ सिनेमात त्यांनी कॅमिओही केला. रेखाला आत्तापर्यंत राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार, आयफा पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. चित्रपटसृष्टीत जेव्हा रेखा आली तेव्हा तिच्यावर दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा प्रभाव होता. त्यामुळे ती काहीशी जाड, सावळी अशी वाटत होती. मात्र नंतर तिने तिची स्टाईल पूर्णपणे बदलली. त्याच स्टायलिश अंदाजात ती आजही वावरते. त्यामुळे रेखा म्हटलं की बस नाम ही काफी है हे वाक्य आपल्या तोंडी येतंच.