भिडेंची सोनू चक्क साडी नेसून गेली जीममध्ये, तिचा ‘हा’ अवतार पाहून नेटकरी हैराण

निधी भानूशालीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Nidhi-Bhanushali, Nidhi-Bhanushali viral photo,
निधी भानूशालीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेतील जुनी सोनू म्हणजेच निधी भानुशालीचे लाखो चाहते आहेत. निधी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतेच निधीने जीममधले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

निधीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निधी जीममध्ये असल्याचे दिसत आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे तिने परिधान केलेल्या कपड्यांनी वेधले आहे. निधीने पांढऱ्या रंगाचं क्रॉप टॉप आणि साडी नेसली केली आहे. हे फोटो शेअर करत का असं केलं विचारू नका, असे कॅप्शन तिने दिले आहे.

आणखी वाचा : बिग बॉस मराठी ३ : मीरा आणि सोनालीमध्ये झाली हाणामारी?

आणखी वाचा : “अचानक घरात एक अनोळखी महिला घुसली आणि मला पाहून म्हणाली…”, सैफने सांगितला तो धक्कादायक अनुभव

निधी गेल्या काही दिवसांपासून सतत त्याच्या रोड ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होती. दरम्यान, या आधी निधी ही तारक मेहता मालिकेत आत्माराम भिडे यांनी मुलगी सोनूची भूमिका साकारत होती. ती टप्पू सेनेतील सगळ्यात हुशार मेंबर होती. आता ही भूमिका पलक सिधवानी साकारतेय निधी आणि पलक आधी झील मेहता ही भूमिका साकारत होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Taarak mehta ka ooltah chashmah old sonu reached the gym in sari dcp