शिवराज मालुसरे हे तान्हाजींचे बारावे वंशज.. त्यांच्या पत्नी शीतल मालुसरे यांनी तान्हाजींच्या इतिहासावर पीएचडी केली आहे. अजय देवगणच्या ‘तान्हाजी’ चित्रपटात दाखवलेल्या इतिहासाविषयी बरीच मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. अशातच तान्हाजींच्या वंशजांनी चित्रपटाच्या शेवटाविषयी प्रश्न उपस्थित केला आहे. ‘उदयभान राठोडवर शेवटचा वार हे शेलार मामा करतात, त्यामुळे चित्रपटात ते दाखवणं गरजेचं होतं,’ असं शीतल मालुसरे म्हणतात.
पाहा त्यांची मुलाखत-
‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा अजय देवगणचा १०० वा चित्रपट असून बॉक्स ऑफिसवर त्याची दणक्यात कमाई सुरू आहे. या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा २०० कोटींचा आकडा पार केला आहे.