एक दशकाहून अधिककाळ प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी सब टीव्हीवरील मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ आजही प्रेक्षक नित्यनियमाने बघत असतात. सध्या या मालिकेतील अनेक कलाकार मालिका सोडून जात आहेत. मात्र निर्माते मालिका सुरु ठेवणार या मतावर ठाम आहेत. या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. यातील जेठालाल दया भाभी हे पात्र यांची जोडी प्रेक्षकांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. मात्र जेठालाल बबिता यांच्यातील एक वेगळी केमिस्ट्री लोकांना विशेष आवडली आहे.

‘जेठालाल’ हे मध्यवर्ती पात्र या मालिकेत आपण बघत आहोत. रोजच्या दैनंदिन जीवनातील अडचणींमुळे पिचलेला जेठालाल आपल्याच सोसायटीमध्ये बबिता या पात्राच्या मागे असतो. तिच्याशी बोलण्यासाठी तो काही ना काही कारण काढत असतो. ‘बबिता’ हे पात्र रंगवलं आहे अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने, मुनमुन दत्ता अभिनेत्री होण्याआधी काही वर्ष मॉडेलिंग करत होती. आपल्या लूकमुळेच तिला ‘बबिता’ हे पात्र साकारायला मिळाले. मात्र मुनमुनच्या खऱ्या आयुष्यातदेखील एक जेठालाल होता.

क्रांती रेडकरचे निर्मिती क्षेत्रात पदार्पण, ओटीटीवर प्रदर्शित होणार पहिला मराठी रिॲलिटी शो

अभिनेत्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की तिचे अनेक लग्न झालेले मित्र तिला पसंत करतात. तिच्याशी फ्लर्ट करतात. ती पुढे म्हणाली , ‘असा प्रकार कोणत्याच महिलेला आवडत नाही. अर्थात मला ही हा प्रकार आवडत नाही. माझे अनेक मित्र आहेत जे माझी प्रशंसा करतात त्यांचे लग्नदेखील झाले आहे. मात्र असे मित्र नुकसान करणारे नाहीत उलट ते तुमची प्रशंसा करतात. ते मला सांगतात की तू आमची क्रश आहेस त्यावर मीदेखील ठीक आहे इतकाच रिप्लाय देते’.

‘हम सब बाराती’ या मालिकेतून त्याने मुनमुन अभिनयात पदार्पण केले. या मालिकेतही त्यांच्यासोबत दिलीप जोशी म्हणजेच जेठालाल होते. इथेच तिची ओळख दिलीप यांच्याबरोबर झाली.दिलीप जोशी यांनीही मुनमुनला ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत आणले होते. अभिनयाच्या बरोबरीने ती स्वतःला फिट ठेवते. मुनमुनचे स्वतःचे यूट्यूब चॅनलदेखील आहे. जिथे ती तिची फिटनेस व्हिडिओ शेअर करते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुनमुन दत्ता मूळची पश्चिम बंगालची, तिचा जन्म २८ सप्टेंबर १९८७ साली एका बंगाली कुटुंबात झाला. तिने इंग्रजी विषयात पदवी संपादन केली आहे. अभिनयात करियर करण्यासाठी तिने मुंबई गाठली. ‘मुंबई एक्सप्रेस’, ‘हॉलिडे’ यासारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.