आभिनेत्री कविता नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते. कविताने तिच्या अभिनयामुळे प्रक्षकांचे मन जिंकले आहे. तिने ‘FIR’ या मालिकेमध्ये चंद्रमुखी चौटालाची भूमिका साकारली होती. प्रक्षकांनी तिने साकारलेल्या भूमिकेला खुप प्रेम दिले. या मधील तिच्या बिनधास्त अंदाज प्रक्षकांच्या पसंतीस उतरला होता. खऱ्या आयुष्यातही कविता अशीच बिनधास्त आहे आणि अनेकदा ती तिचे मत परखडपणे मांडताना दिसते. प्रत्येक स्त्रीला आई व्हायचे असते. ती तिच्यासाठी खुुप मोठी गोष्ट असते. मात्र कविताला आई होण्याची इच्छा नसल्याचा मोठा खुलासा तिने एका मुलाखतीत केला आहे.

कविता कौशिकने तिचा मित्र बिझनेसमन रोनित बिसवाशी जानेवारी २०१७ साली लग्न बंधनात अडकले. त्यांचे लग्नं अगदी साधेपणात पार पडले होते. एका मुलाखतीत कविताला ती आई कधी बनणार, काही प्लाॅन केलं आहे का? असा प्रश्नं विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ति म्हणाली, “माझ्याकडे एक मांजर आणि कुत्रा आहे. तेच माझे कुटुंब आहेत, मला या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात माझ्या मुलाला आणण्याची इच्छा नाही.”

कविताची लोकप्रिय मालिका ‘FIR’ नंतर तिने काही काळ मालिकांमधून ब्रेक घेतला त्यानंतर ती कलर्सवरील लोकप्रिय शो ‘बिग बॉसम १४’ मध्ये वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती, मात्र घरात सतत वाद होत असल्याने तिने बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तसंच जेंव्हा तिला पुन्हा ‘FIR’ मध्ये काम करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने सांगितले, “हो मला या मालिकेसाठी काम करायला नक्की आवडेल, तसे अनेकदा या विषयी बोलणे देखील झाले आहे मात्र या मालिकेच्या दिग्दर्शकांची टीम इतर प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त असल्याने पुढे कुठलाच निर्णय होत नाही.”