छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती १९ फेब्रुवारीला सर्वत्र मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यानिमित्त महाराजांना अभिवादन करण्यासाठी ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांनी खास वेशभूषा केली होती.

संपूर्ण महाराष्ट्राप्रमाणेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यात देखील नागरिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी ‘बिग बॉस’ फेम अभिजीत बिचुकले यांनी शिवरायांप्रती असलेल्या आपल्या प्रेमळ भावना व्यक्त करण्यासाठी महाराजांची खास वेशभूषा साकारली होती. तसेच साताऱ्यातील शिवतीर्थावर असलेल्या महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून बिचकुले यांनी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.

हेही वाचा : Video : ‘हळद लागली हो…’, लग्नाच्या १८ दिवसांनंतर शिवानी सुर्वेनी शेअर केला खास व्हिडीओ! मेहंदी, संगीत अन्…

अभिजीत बिचुकले हे मूळचे साताऱ्याचे आहेत. “माझ्यासारख्या अनेक कलाकारांना आपल्याला महाराजांची भूमिका साकारायला मिळावी ही इच्छा असते. त्यांची रंगछटा, वेशभूषा करावी असं वाटतं. शिवरायांचा वैचारिक वारस या नात्याने मी आज महाराजांच्या वेशामध्ये आलो” असं बिचकुले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.

हेही वाचा : Video : “मी बहिरा नाहीये…”, रणबीर कपूर फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात करण जोहरवर भडकला, नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिजीत बिचकुले ‘बिग बॉस’ मराठीच्या दुसऱ्या सीझनमुळे प्रकाशझोतात आले. यानंतर त्यांनी ‘बिग बॉस हिंदी’च्या १५ व्या सीझनमध्ये सहभाग घेतला होता.