सध्या लग्नसराई सुरू आहे. अनेक कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करताना दिसत आहेत. पण दुसऱ्या बाजूला बरेच कलाकार घटस्फोट घेताना पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री दलजीत कौर व व्यावसायिक निखिल पटेल हे विभक्त झाले. त्यानंतर आता हिंदी मालकाविश्वातील अभिनेता घटस्फोट घेत आहे.

‘भाग्यलक्ष्मी’, ‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेता अभिषेक मलिक (Abhishek Malik) सुहानी चौधरीशी घटस्फोट घेणार असल्याचं समोर आलं आहे. याबाबत दोघं ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या वृत्तसंस्थेशी बोलले. अभिषेक म्हणाला, “हा. हे खरं आहे. सुहानी आणि मी विभक्त होतं असून आयुष्यात पुढे जात आहोत. आम्ही आमच्या वैवाहिक जीवनात अनुरुपता आणि समंजसपणासारख्या समस्येचा सामना केला. पण आमच्यात कटूता नाही. मी तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.”

Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
Actress Amala Paul baby shower in gujarati style
सासरी गुजराती पद्धतीने पार पडलं प्रसिद्ध अभिनेत्रीचं डोहाळे जेवण, पाच महिन्यांपूर्वी केलंय दुसरं लग्न
mohena kumari welcomes baby girl
प्रसिद्ध अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पाच वर्षांपूर्वी अभिनय सोडून मंत्र्याच्या मुलाशी केलंय लग्न
Karan Sharma Ties Knot With actress Pooja Singh
Video: पाच वर्षांपूर्वी मोडलं पहिलं लग्न, प्रसिद्ध अभिनेत्याने ९ वर्षांनी लहान अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – भर कार्यक्रमात राज ठाकरेंनी संकर्षण कऱ्हाडेचे कान टोचले, म्हणाले, “त्या दिवशी मी नाट्य संमेलनामध्ये…”

पत्नी सुहानी चौधरी म्हणाली, “आम्ही जेव्हा एकत्र राहू लागलो तेव्हा मला कळालं की, आमच्यात बरेच मतभेद आहेत. याचा आम्हाला पश्चाताप नाही. आता आयुष्यात पुढे जायला पाहिजे, याची जाणीव आमच्या दोघांना झाली आहे. विभक्त होणे हा आमच्यासाठी योग्य निर्णय आहे. मी अभिषेकला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देते.”

अभिषेक व सुहानीचं ऑक्टोबर २०२१मध्ये दिल्लीत मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा झाला होता. त्यापूर्वी दोघं एकमेकांना नऊ महिने डेट करत होते. पण आता वैवाहिक जीवनातील समस्यांमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – सिद्धू मुसेवालाचा जिवलग मित्र बंटी बेंसवर जीवघेणा हल्ला, रेस्टॉरंटमध्ये केला गोळीबार

दरम्यान, अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, २०१२ साली त्याने ‘छल – शह और मात’ या मालिकेतून हिंदी मालिकाविश्वात पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘दिल की नज़र से खूबसूरत’, ‘पुनर्विवाह – एक नई उम्मीद’, ‘स्प्लिट्सविला’ सातव पर्व, ‘प्यार तूने क्या किया’, ‘कैसी ये यारियां’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘एक विवाह ऐसा भी’, ‘ये है मोहब्बतें’, ‘कहां हम कहां तुम’, ‘पिंजरा खूबसूरती का’ आणि ‘मुस्कुराने की वजह तुम हो’ अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.