Premium

“असं वाटलं खूप मोठी चूक झाली माझ्याकडून…,” धनश्री काडगावकरची लेकासाठी भावुक पोस्ट

सध्या ती ‘तू चाल पुढं’ मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसत आहे.

dhanashri

अभिनेत्री धनश्री काडगावकर ही मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने तिला नवी ओळख दिली. तर सध्या ती ‘तू चाल पुढं’ मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसत आहे. धनश्रीच्या कामाचं नेहमी कौतुक होत असतंच पण याचबरोबर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. आता तिने तिच्या लेकासाठी एक भावुक पोस्ट लिहिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

धनश्रीनच्या मुलीचं नाव कबीर आहे. तिने तिच्या मुलाचा एक गोड व्हिडीओ शेअर करत लिहिलं, “कबीर फक्त दीड वर्षांचा होता जेव्हा त्याला सोडून काम करायला सुरुवात केली .. पुणे सोडून मुंबईत आले…लगेच त्याला इथे आणणं शक्य नव्हतं. त्याचं vaccination,doctors सगळं पुण्यात होतं. असं वाटलं खूप मोठी चूक झाली माझ्याकडून किंवा घाई केली का मी. थोडं थांबायला हवं होतं निदान तो बोलू लागेपर्यंत तरी…तो मला विसरून जाईल का असंही वाटलं होतं…पण ती एक phase असते, ती पास झाली कि गोष्टी होतात सगळ्या नीट.”

हेही वाचा : ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’साठी दिलीप प्रभावळकर घालायचे तब्बल १६ नंबरचा चष्मा, शूटिंगच्या आठवणी शेअर करत म्हणाले…

पुढे ती म्हणाली, “खरंतर अजून कबीरने सिरीयल बघितली पण नाहीय्ये.. मुळात त्याला TVचं अजून introduce केला नाहीये आम्ही. त्याला फक्त इतकच माहितीये की आई शूटिंग करते, मेकअप करते. मी नाही म्हणून त्याने आजपर्यंत कधीच असा खूप गोंधळ घातला नाही (या गोष्टीचं बरंही वाटतं पण तितकंच वाईट पण वाटतं. सगळ्या new working moms सहमत असतील याला) अजून तरी कबीर छान सपोर्ट करतोय, पुढचं माहित नाही. त्याला एके दिवशी सांगितलं की मी शिल्पी नावाचं character करते, तेव्हा तो शब्द कदाचित त्याला खूप आवडला आणि त्या नावात, त्या शब्दात त्याला काहीतरी गंम्मत वाटली असावी, म्हणून प्रत्येक वेळी जेव्हा तो शिल्पी म्हणतोय तेव्हा तेव्हा तो खूप हसतोय.

आणखी वाचा : धनश्री काडगावकर पुन्हा एकदा दिसणार नकारात्मक भूमिकेत ‘या’ मालिकेत करणार काम

शेवटी तिने लिहिलं, “आत्ता ही सुरुवात आहे, वाट बघीन मी त्याच्याकडून हे ऐकायची की, ‘आई तू खूप छान काम करतेस आणि असंच काम करत राहा..तू मला फार वेळ देऊ शकत नाहीस पण तू माझ्या भविष्याची तरतूद करतेयस.. आणि त्या पेक्षा महत्वाचं म्हणजे तू तुझी passion follow करतेय.’ बास…आणखी काय हवं असेल मला. बास असेच छान छान प्रोजेक्ट्स मला मिळत राहो.. तुम्हा सगळयांचं प्रेम असंच राहू द्या.”

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Actress dhanashri kadgaonkar shared a special post for her son goes viral rnv