उर्फी जावेद ही तिच्या कपड्यांमुळे कायमच चर्चेत असते. प्रत्येक वेळी ती कॅमेऱ्यासमोर असे काहीतरी परिधान करून येते ज्याचा कोणी विचारही करू शकत नाही. उर्फी नेहमीच हटके कपड्यांमध्ये दिसून येते. अशी एकाही वस्तू नाही जी वापरून उर्फी नाही तिचे कपडे शिवले नाहीत. अनेकदा यावरून तिला ट्रोल केलं जातं. पण आता तिच्या नवीन लूकमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

काल पहिल्यांदाच सर्वांना उर्फीचा संस्कारी लूक पहायला मिळाला. यावेळी उर्फीने कोणतीही अतरंगी फॅशन न करता साधा डिझाईनर कुर्ता परिधान केला होता. पर्पल रंगाचा हा सुंदर कुर्ता नीना गुप्ता यांची लेक मसाबाच्या कपड्यांच्या ब्रँडचा होता. हा कुर्ता साधा जारी दिसत असला तरी याची किंमत बरीच आहे.

आणखी वाचा : “मी त्यांना नकार दिला पण तरीही ते…” कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल उर्फी जावेदचा गौप्यस्फोट

उर्फीने परिधान केलेला हा कुर्ता ‘हाऊस ऑफ मसाबा’चा आहे. हा ब्रँड प्रसिद्ध सेलिब्रिटी डिझायनर मसाबा गुप्ताचा आहे. नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा ही एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे आणि अनेक सेलिब्रिटी तिने डिझाईन केलेल्या पोशाखात दिसतात. हाउस ऑफ मसाबाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, उर्फीने काल परिधान केलेल्या या ड्रेसची किंमत तब्बल १२ हजार आहे.

हेही वाचा : “माझी मानसिक स्थिती…” सतत होणाऱ्या ट्रोलिंगमुळे उर्फी जावेदला होतोय त्रास

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फीचा तो लूक आता खूप चर्चेत आला आहे. या ड्रेसमधील तिच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नेटकरी विविध कमेंट्स करत आश्चर्य व्यक्त करत आहेत. एकाने लिहिलं की, “तू अशा कपड्यांमध्ये जास्त सुंदर दिसतेस.” तर दुसऱ्याने लिहिलं, “कपड्यांचे नशीब उजळलं आहे.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “व्वा, तुझ्याकडे कपडेही आहेत!!” तर यानंतर त्या ड्रेसची किंमत कळल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.