सध्या सर्वत्र लग्नाचा माहोल आहे. अनेकजण विवाहबंधनात अडकत आहेत. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. गेल्या एका महिन्यात हिंदी आणि मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार विवाह बंधनात अडकले आहेत, तर येत्या काळात काही लग्न करणार आहेत. आता या यादीत एका लोकप्रिय हिंदी अभिनेत्रीचा समावेश झाला आहे.

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम अभिनेत्री वृशिका मेहता हिने नुकतीच सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली. तिने नुकताच साखरपुडा केल्याचं सोशल मीडिया वरून जाहीर केलं. सौरभ घेडिया तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे.

आणखी वाचा : चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकूनसुद्धा किंग खान म्हणतो, “तुम्ही ‘पठाण’ पाहायला हवा, कारण…”

वृशिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करत तिने ११ डिसेंबर रोजी साखरपुडा केल्याचं तिच्या चाहत्यांना सांगितलं. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, “आमच्या नात्याची नवी सुरुवात…११ डिसेंबर २०२२.” तिचे हे फोटो पाहून मनोरंजन सृष्टीतील तिच्या मित्र-मैत्रिणींनी तसंच तिच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : हिना खानने मॅनेजरच्या लग्नात केलेल्या ‘या’ कृतीमुळे नवरदेवाला थेट गमवावे लागले १ लाख रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वृशिका ‘दिल दोस्ती डांस’, ‘ये है आशिकी’, ‘इश्कबाज़’, ‘ये तेरी गलियां’ अशा विविध मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्याचप्रमाणे ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या तुफान गाजलेल्या मालिकेतही ती झळकली. या मालिकेतील डॉ. रिद्धिमा सक्सेना ही व्यक्तिरेखा साकारली होती.