गेल्या काही दिवसांपासून ‘झी मराठी’ वाहिनीवरील सतत काही मालिकांच्या वेळा बदलण्यात येत आहेत. हार्दिक जोशीचा ‘जाऊ बाई गावात’ हा नवा कार्यक्रम ४ डिसेंबरपासून ९.३० वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी दोन मालिकांच्या वेळा बदलण्यात आल्या होत्या. ‘३६ गुणी जोडी’ दुपारी २.३० वाजता तर ‘नवा गडी नवं राज्य’ दुपारी २ वाजता प्रसारित करण्याचा निर्णय ‘झी मराठी’ने घेतला होता. पण सतत ‘३६ गुणी जोडी’ मालिकेच्या वेळेत बदल होत असल्यामुळे प्रेक्षकांनी या निर्णयाचा विरोध करत संतप्त भावना व्यक्त केली. त्यानंतर आता ‘झी मराठी’ने हा निर्णय मागे घेतला आहे.

आयुष्य संजीव आणि अनुष्का सरकटे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘३६ गुणी जोडी’ मालिका २३ जानेवारी २०२३ रोजी सुरू झाली. सुरुवातीला सायंकाळी ६.३० वाजता ही मालिका प्रसारित केली जाऊ लागली. पण काही काळानंतर या मालिकेच्या वेळेत बदल करून रात्री ११ वाजता प्रसारित करण्यात आली. सध्या आठवडाभर ही मालिका रात्री ९ वाजता प्रसारित करण्यात येत आहे. पण ४ डिसेंबरपासून ‘३६ गुणी जोडी’ मालिका दुपारी २.३० वाजता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला. हे पाहून प्रेक्षकांनी तीव्र विरोध दर्शवला. सतत मालिकेच्या वेळेत बदल करत असल्यामुळे सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. “कलाकार सुद्धा एवढे कपडे बदलत नाहीत तेवढ्या वेगाने झी मराठी मालिकेच्या वेळा बदलत आहे”, “या लोकांचा वेड्याचा बाजार आहे.”, “फक्त ‘३६ गुणी जोडी’ मालिकेला टारगेट करण्यात येत आहे”, अशा अनेक प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या.

हेही वाचा – ‘आई कुठे काय करत’ फेम गौरी कुलकर्णीने सांगितला अभिनय क्षेत्रातील पदार्पणाचा किस्सा, अभिनेत्री म्हणाली, “पूर्वी मायक्रोसॉफ्टच्या…”

प्रेक्षकांच्या याच संतप्त प्रतिक्रियेनंतर ‘झी मराठी’ने निर्णय मागे घेतला आहे. ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका ४ डिसेंबरपासून दुपारी २.३० वाजता नाही तर आधीच्या वेळेत रात्री ११ वाजता प्रसारित करण्याचा निर्णय ‘झी मराठी’ने घेतला आहे. यासंदर्भात ‘मराठी टीव्ही इन्फो’ या इन्स्टाग्रामवर माहिती देण्यात आहे.

हेही वाचा – Bigg Boss 17: बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ‘हा’ स्पर्धक घराबाहेर; अंकिता लोखंडेसह अभिषेक रडू लागले ढसाढसा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘नवा गडी नवं राज्य’ आणि ‘चला हवा येऊ द्या’ यांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ४ डिसेंबरपासून ‘नवा गडी नवं राज्य’ ही मालिका दुपारी २ वाजता प्रसारित होणार आहे. तर ‘चला हवा येऊ द्या’ संध्याकाळी ८.३० वाजता प्रसारित होणार आहे.