मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी व अक्षया देवधर २ डिसेंबरला विवाहबद्ध झाले. सप्तपदी घेत त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली. मित्रपरिवार, कुटुंबियांच्या उपस्थितीत पुण्यात त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. अक्षया-हार्दिकच्या लग्नातील अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून अक्षया व हार्दिक घराघरात पोहोचले. या मालिकेतील त्यांची राणादा-पाठकबाईंची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अक्षया-हार्दिक विवाहबंधनात अडकल्यानंतर तुझ्यात जीव रंगला मालिकेतील त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मालिकेतील राणादा-पाठकबाईंच्या विवाहसोहळ्याचा हा क्षण आहे.

हेही वाचा>> “अक्कलकोटला गेल्यानंतर मला पहिल्यांदा…” ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ फेम अभिनेत्रीने सांगितला ‘तो’ अनुभव

हेही वाचा>> हास्यजत्रा फेम गौरव मोरेने शेअर केला एअरपोर्टवरील फोटो, चाहते कमेंट करत म्हणतात “शाहरुख खानच्या पठाण…”

अभिनेता अमोल नाईक यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. अमोल नाईक यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत राणादाच्या मित्राची ‘बरकत’ ही भूमिका साकारली होती. अक्षया-हार्दिकच्या विवाहसोहळ्यातील अनेक फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

आणखी वाचा>> उर्फी जावेद…बाई अंगभर नाही पण निदान शोभतील असे कपडे घाल!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अक्षया-हार्दिकच्या विवाहसोहळ्याला कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. ऑन स्क्रीन जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधल्याने चाहतेही खूश आहेत. अनेकांनी त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छाही दिल्या आहेत.