मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी हार्दिक जोशी व अक्षया देवधर यांनी २ डिसेंबरला खऱ्या आयुष्यात लग्नगाठ बांधली. अक्षया व हार्दिक सध्या त्यांच्या विवाहित जीवनाचा आनंद घेत आहेत. या दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली होती, तसेच त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

हार्दिक व अक्षया सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत. दोघेही फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. आज मकर संक्रांत आहे आणि लग्नानंतर ही अक्षयाची पहिलीच संक्रांत आहे. त्यानिमित्ताने तिने काळ्या साडीतील एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. अक्षयाने काळी काठपदराची साडी, नाकात नथ आणि गळ्यात मोत्यांची माळ, मंगळसूत्र घातलं आहे. तसेच केसात तिने गजरा माळला आहे. ‘सुख कळले’, असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अक्षयाच्या या व्हिडीओवर चाहते तिला लग्नानंतरच्या पहिल्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत आहेत. ‘पाठबाई खूपच सुंदर’, ‘पाठकबाई छान दिसत आहात’, ‘तुमची साडी खूप सुंदर आहे’, अशा कमेंट्स तिच्या चाहत्यांनी केल्या आहेत.