अभिनेते व खासदार अमोल कोल्हे यांनी एमबीबीएस केलं आहे, ते डॉक्टर आहेत. त्यांनी केईएम मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं. शिकतानाच त्यांनी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा विचार केला. नंतर त्यांनी शिक्षण पूर्ण केलं, पण करिअर म्हणून अभिनयक्षेत्र निवडलं. अमोल कोल्हे यांनी ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमात हजेरी लावली. त्यात त्यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार व त्यांच्या डॉक्टर मित्रांचा पगार याबद्दल विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं.

कोण आहे रवींद्र महाजनींची मुलगी? गश्मीरने शेअर केलेले बहिणीचे फोटो पाहिलेत का?

अवधूत गुप्तेने डॉ. अमोल कोल्हेंना प्रश्न विचारला. “केईएमच्या मेडिकल कॉलेजमधील तुमच्या बॅचचे गेट टुगेदर नक्की होत असेल. आता जेव्हा त्यावेळचे ५० मित्र भेटत असतील, त्यापैकी १०-१५ तरी मोठे-मोठे सर्जन झाले असतील. त्यांचा पर डे (एका दिवसाचा पगार) जास्त असतो की तुमचा जास्त असतो?” असा प्रश्न अवधूत गुप्तेने विचारला.

“शरद पवारांनी जातीचं राजकारण आणलं” राज ठाकरेंच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंची रोखठोक प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवधूतच्या या प्रश्नाचं उत्तर देत अमोल कोल्हे म्हणाले, “पर डे त्यांचा जास्त असतो. फक्त ते जेव्हा कुठे बाहेर जातात, त्यांना व्हिजीटिंग कार्ड द्यावं लागतं आणि जेव्हा मी जातो, तेव्हा लोकांना मी येतोय हे कळलेलं असतं.” दरम्यान, डॉ. अमोल कोल्हे हे यशस्वी अभिनेते व राजकारणी आहेत, त्यांचे लाखो चाहते आहेत. त्यामुळे डॉक्टर मित्रांच्या तुलनेत डॉ. अमोल कोल्हे नक्कीच जास्त लोकप्रिय आहेत.