‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अवधूत गुप्ते सूत्रसंचालन करत असलेल्या या शोच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली होती. आता दुसऱ्या सीझनसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार आहेत. अवधूत गुप्तेने राज ठाकरेंबरोबरचा फोटो सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या फोटोला त्याने “मी, ते (राज साहेब) आणि ती (खुर्ची).. ४ जूनला रात्री ९ वाजता! आता प्रत्येक रविवार…धारदार!!” असं कॅप्शन दिलं आहे. अवधूत गुप्तेची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
Raj thackeray, Mahayuti, MNS,
मनसेच्या पाठिंब्याने महायुतीचा फायदा किती ?
Why stress test of mutual fund is important
तुमच्या म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट काय सांगते? म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट महत्त्वाची का?
einstein brain history
आइन्स्टाईनच्या मेंदूची चोरी आणि २४० तुकडे; जाणून घ्या महान वैज्ञानिकाच्या मृत्यूनंतरचे गूढ

हेही वाचा>> ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरे अडकला विवाहबंधनात, पत्नीबरोबरचे फोटो व्हायरल

राज ठाकरेंचे ‘खुपते तिथे गुप्ते’मधील काही प्रोमो व्हिडीओ झी मराठीच्या ऑफिशिअल पेजवरुन शेअर करण्यात आले आहेत. या व्हिडीओमध्ये राज ठाकरे अजित पवारांवर फटाकेबाजी करताना दिसत आहे. “अजित पवार स्वत:च्या मुलाला निवडून आणू शकले नाहीत. बारामतीत काकांनी हात बाजूला केला, तर यांचं तरी काय होईल?” असं म्हणताना ते दिसत आहेत.

‘खुपते तिथे गुप्ते’ या शोमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हजेरी लावणार आहेत. ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता हा शो प्रसारित करण्यात येणार आहे.