‘बिग बॉस’चं १७वं पर्व दिवसेंदिवस रंजक होतं चाललं आहे. १५ ऑक्टोबरपासून सुरू झालेलं हे नवं पर्व प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस पडलं आहे. अशातच जेव्हा वीकेंड जवळ येतो, तेव्हा बिग बॉस घरात काहीना काही तरी हंगामा होणार हे निश्चित असतं. या वीकेंडच्या वारला आजतागायत न झालेली गोष्ट घडणार आहे. बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे एका स्पर्धकाला घराबाहेर केलं जाणार आहे. याचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

‘बिग बॉस’चा या आठवड्यातील वीकेंडचा वार सलमान खान ऐवजी करण जोहर होस्ट करताना दिसणार आहे. आज करण जोहर महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार आहे. याचा प्रोमो कलर्स टीव्हीच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये करण जाहीर करतो की, बिग बॉसच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे तेहेलका तुला या घरातून बाहेर काढलं जात आहे.

हेही वाचा – प्रेमाची गोष्ट: ‘या’ अटीवर मुक्ता सागरबरोबर लग्न करायला झाली तयार, मालिकेचा नवा प्रोमो आला समोर

करणने जाहीर केलेल्या या निर्णयानंतर घरातील इतर स्पर्धकांना धक्काच बसतो. अंकिता लोखंडेसह विक्की जैन, मुन्नवर, अभिषेक कुमार, अरुण ढसाढसा रडू लागतो. अरुण, अभिषेक कॅमेरासमोर येऊन हात जोडून बिग बॉसला विनवणी करतात. ‘पुन्हा असं होणार नाही’, ‘आम्ही माफी मागतो’, असं अरुण प्रोमोमध्ये म्हणताना दिसतं आहे.

हेही वाचा – Video: पृथ्वीक प्रतापला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांनी केली गर्दी; व्हिडीओ पाहून प्रियदर्शनी इंदलकर म्हणाली, “शाहरुख खान सारखं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, तेहेलका भाई उर्फ सनी आर्य आणि अभिषेक कुमारचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये अभिषेक ओरडताना दिसत आहे. तर तेहेलका अभिषेकशी फिजिकल होताना पाहायला मिळत आहे. याच प्रकरणावरून तेहेलकाला शो बाहेर केलं जातं असल्याचं बोललं जात आहे.