‘बिग बॉस’ मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज रंगताना दिसत आहे. एकीकडे बिग बॉस मराठीचा विजेता कोण होणार याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहताना दिसत आहे. तर दुसरीकडे बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातील टॉप ५ स्पर्धकांमधून टॉप ३ स्पर्धक समोर आले आहेत. नुकत्याच झालेल्या टास्कदरम्यान बिग बॉसमधून एका स्पर्धकाला बाहेर पडावे लागले आहे.

तब्बल १०० दिवसांचा खेळ पूर्ण केल्यानंतर ‘बिग बॉस’च्या घराला टॉप ५ सदस्य मिळाले. यात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, राखी सावंत, किरण माने आणि अमृता धोंगडे या स्पर्धकांचा समावेश होता. यात राखी सावंत हिने बझर राऊंड या टास्कमध्ये बझर वाजवत बाहेर पडली. या टास्कदरम्यान स्पर्धकांपुढे एक पर्याय ठेवण्यात आला होता. या पर्यायामध्ये विजेत्या स्पर्धकाला मोठी रक्कम मिळणार आहे.

आणखी वाचा : “बाकी ते ठरवतीलचं…” रुचिरा जाधवने केली ‘बिग बॉस मराठी’च्या निर्मात्यांची पोलखोल

मात्र इतर स्पर्धकांना बक्षीस मिळणार नाही म्हणून हा बझर राउंड ठेवण्यात आला, ज्यात स्पर्धक ९ लाख रुपये घेऊन घराच्या बाहेर पडू शकतात. त्यात सुरवातीला ५ लाख इतकी रक्कम होती नंतर ती वाढवण्यात आली. यावेळी शेवटच्या क्षणी राखी सावंतने हा पर्याय निवडला. त्यानंतर ती घराबाहेर पडली आहे. यामुळे बिग बॉसच्या घरात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, किरण माने आणि अमृता धोंगडे हे चार सदस्य राहिले. या टास्कनंतर पुन्हा एकदा एलिमेनेशन टास्क पार पडला.

आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या विजेत्याला मिळणाऱ्या ट्रॉफीचा पहिला लूक समोर, पाहा व्हिडीओ

या टास्कमध्ये उरलेल्या चार स्पर्धकांसाठी चार बॉक्स ठेवण्यात आले. त्या बॉक्सच्या बाहेर दिवे लावले होते. ज्याच्या बॉक्स बाहेरचा दिवा बंद होईल तो स्पर्धक घराबाहेर असा हा टास्क होता. यावेळी सुरुवातीला किरण माने, त्यानंतर अक्षय केळकर आणि शेवटी अपूर्वा नेमळेकर यांच्या बॉक्सचे दिवे सुरु होते. पण अखेर अमृता धोंगडे ही घराबाहेर पडली. यावेळी घरातून बाहेर पडताना तिने प्रेक्षकांचे आणि महेश मांजरेकरांचे आभार मानले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबरोबरच बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचे टॉप ३ स्पर्धकही समोर आले आहेत. बिग बॉसच्या घरात अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, किरण माने असे तिघेजण टॉप ३ स्पर्धक ठरले. आता यापैकी कोणाला बिग बॉस मराठीची मानाची ट्रॉफी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.