Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यंदा एकापेक्षा एक हरहुन्नरी कलाकारांनी सहभाग घेतला आहे. टास्कमध्ये हे सदस्य आपआपसांत कितीही भांडले तरीही, अनेकदा सगळी भांडणं विसरून घरात एकत्र धमालमस्ती करत असतात. अभिजीत आणि सूरजचं घरात पहिल्या दिवसापासून चांगलं बॉण्डिंग आहे. सध्या या दोघांच्या एका व्हिडीओ प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये सूरज अभिजीतला शाहरुख खानची मिमिक्री करून दाखवण्यास सांगत आहे.

सूरजने शाहरुख खानची मिमिक्री करून दाखवण्यास सांगितल्यावर सुरुवातीला अभिजीत ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाची धून गुणगुणतो. पुढे, तो सूरजला शाहरुखचे फिल्मी डायलॉग बोलून दाखलतो. किंग खानची बोलण्याची लकब, त्याचं हसणं याची हुबेहूब मिमिक्री अभिजीतने केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : Video : “मी कोणत्याही टीमचा…”, धनंजयने गेमच बदलला! निक्कीसमोर मांडलं स्पष्ट मत; काय आहे नवीन Strategy?

अभिजीतने केली शाहरुख खानची मिमिक्री

अभिजीतची मिमिक्री पाहून सूरज खळखळून हसतो, तर वर्षा उसगांवकर गायकाचं टाळ्या वाजवून कौतुक करतात. शाहरुख खाननंतर सूरज अभिजीतला अजून कोणाची तरी मिमिक्री करून दाखवा असं सांगतो. यावर अभिजीत “अरे एवढंच येतं रे मला…” असं म्हणताना या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

अभिजीतची मिमिक्री पाहून नेटकरी सुद्धा थक्क झाले आहेत. “मस्त मिमिक्री करतो भाई”, “वॉव अभिजीत”, “सेम शाहरुख खान”, “मस्त छानच…शेवटी हसलास ना असं वाटलं की, खरंच शाहरुख खान आला की काय”, “खूप छान अभिजीत”, “सिर्फ १९-२० का फरक है” अशा प्रतिक्रिया कमेंट सेक्शनमध्ये देत नेटकऱ्यांनी अभिजीत सावंतचं भरभरून कौतुक केलं आहे.

bigg boss marathi
Bigg Boss Marathi : अभिजीत सावंत व सूरज चव्हाण ( फोटो सौजन्य : कलर्स मराठी )

हेही वाचा : Bigg Boss Marathi : बिगबॉस सारखे शो प्रेक्षकांच्या मानसिकतेशी कसे खेळतात?

हेही वाचा : “मला पहाटे नारळाच्या झाडावर चढायला लावलं, घरी जेवायला बोलावलं अन् सोडून निघून गेला…”; विवेक ओबेरॉयचा अभिनेत्याबाबत खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘बिग बॉस मराठी’च्या आठव्या आठवड्याबद्दल सांगायचं झालं, तर यावेळी घरात एकूण ५ सदस्य नॉमिनेट झाले आहेत. वर्षा उसगांवकर, अरबाज पटेल, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, सूरज चव्हाण हे पाच जण नॉमिनेट असून यांच्यापैकी कोण घराचा निरोप घेणार हे येत्या वीकेंडला भाऊच्या धक्क्यावर स्पष्ट होणार आहे.