scorecardresearch

Premium

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं स्वत:च घर; व्हिडीओ शेअर करत म्हणाला “कर्ज, जमवाजमव अन्…”

अभिनेत्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

akshay kelakr
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याने मुंबईत घेतलं स्वत:च घर

मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अक्षय केळकर. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वातून अक्षय घराघरात पोहचला. या पर्वात त्याने विजेतेपद पटकावले. अक्षय काही ना काही कारणाने नेहमीच चर्चेत असतो. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. आता अक्षय एका नव्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

हेही वाचा- ठरलं तर मग : संतापलेल्या अर्जुनला सायली ‘असा’ देणार धीर, मालिकेत बहरणार दोघांचं नातं, पाहा प्रोमो

emraan-hashmi-don3
इमरान हाश्मी बनणार ‘डॉन ३’चा खलनायक; खुद्द अभिनेत्यानेच इंस्टाग्राम पोस्टमधून केला खुलासा
divya agarwal and apurva padgaonkar
दिव्या अग्रवाल झाली मराठी कुटुंबाची सून, तिचा पती आहे प्रसिद्ध उद्योजक, तर ती अभिनयाशिवाय करते ‘हा’ व्यवसाय
rajat-kapoor
चित्रपटसृष्टीतील बड्या सेलिब्रिटीजच्या गर्दीत हरवलेला पण, आपल्या कलेतून प्रेक्षकांना समृद्ध करणारा अवलिया ‘कपूर’
priya marathe supports ankita lokhande
“तिचा संघर्ष…”, मराठी अभिनेत्रीची अंकिता लोखंडेसाठी पोस्ट, ‘पवित्र रिश्ता’मध्ये केलंय एकत्र काम, कोण आहे ती?

अक्षयने मुंबईत स्वत:च घर घेतलं आहे. म्हाडाच्या लॉटरीमधून अक्षयला हे घर मिळालं आहे. इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत अक्षयने ही आनंदाची बातमी दिली आहे. व्हिडीओमध्ये अक्षयच्या नवीन घराची झलकही बघायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करत अक्षयने लिहिलं “माझं पहिलं घर – ते ही मुंबईत !!!! २०२३ मध्ये सगळ्या सुंदर गोष्टी आयुष्यात घडल्या, त्यातली खूप सुंदर आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुंबईत माझं स्वतःच “घर” !!! काही वर्षांपूर्वी जेव्हा या क्षेत्रात काम करायला सुरुवात केली, तेव्हा माझ्या ५ मित्रांसोबत, म्हाडाच्या बिल्डिंग मध्ये रूम शेअर करून भाड्याने राहत होतो. त्याच म्हाडाच्या मुंबईच्या प्रकल्पामध्ये या वर्षी अर्ज केला होता आणि सोडतीमध्ये विजेता ठरलो! स्वप्नवत आहे पण, मला हवा तसा view मिळाला आहे. ज्यातून मी रोज चमकणाऱ्या, धावणाऱ्या मुंबईला बघू शकतो.”

हेही वाचा- ‘झी मराठी’वर ४ डिसेंबरपासून होणार मोठा बदल! दोन लोकप्रिय मालिकांचं दुपारी होणार प्रक्षेपण, तर चला हवा येऊ द्या…

अक्षयने पुढे लिहिलं “सगळी जमवाजमव, कागदपत्र, loan, तयारी आणि खूप मोठी, किचकट पण हवीहवीशी procedure… म्हाडाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मनापासून धन्यवाद! ही सगळी procedure पार पाडताना तुमची खूप मदत मिळाली आणि तुमच्यातला posotive approach खरोखर कौतुकास्पद आहे. तुमच्या साथीमुळे घराचा आनंद द्विगुणित झाला. तर, आज माझ्या घराची चावी हातात आली! या वर्षाची सुरुवात आणि शेवट दोन्ही “विजेता” अशी होते आहे, ही मालिका या पुढे अशीच सदैव सुरू राहू दे. तर अश्या प्रकारे, मुंबईत स्वतःच घर झालं! Extremely happy to share that, I Bought my first house in Mumbai”

यापूर्वी अक्षय त्याच्या आई आणि बहिणीबरोबर कळव्यात राहत होता. कळव्याचे घर सोडतानाचा अक्षयने व्हिडीओ शेअर करत एक भावनिक पोस्टही लिहिली होती. व्हिडीओ पोस्ट करत अक्षयने, “आम्हाला तुझी खूप आठवण येईल, पुन्हा एकदा, बाय कळवा घर”, असं लिहिलं होतं. या पोस्टवरून अक्षय नवीन घरात शिफ्ट होणार असल्याची चर्चा रंगली होती. अक्षय केळकरने काही महिन्यांपूर्वी म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरासाठी अर्ज केला होता. पहाडी गोरेगाव आणि मागाठाणेमधील घरांसाठी एकूण तीन अर्ज भरले होते. आता म्हाडाच्या लॉटरीमधून अक्षयला हक्काच घर मिळालं आहे.

हेही वाचा- ‘आई कुठे काय करते’ फेम संजनाचा आनंद गगनात मावेना! ‘अशी’ झाली हेमा मालिनींबरोबर ग्रेट भेट, अनुभव सांगत म्हणाली…

अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर बिग बॉसमध्ये येण्याअगोदर अक्षयने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं. तसेच ‘दोन कटिंग’ या वेब फिल्ममध्येही तो झळकला होता. या वेबसीरिजमध्ये त्याच्याबरोबर समृद्धी केळकरची मुख्य भूमिका होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bigg boss marathi fame actor akshay kelkar buying new home in mumbai dpj

First published on: 30-11-2023 at 11:48 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×