scorecardresearch

Premium

ठरलं तर मग : संतापलेल्या अर्जुनला सायली ‘असा’ देणार धीर, मालिकेत बहरणार दोघांचं नातं, पाहा प्रोमो

Video : ‘सगळ्या मुली सारख्या…’, ‘त्या’ घटनेनंतर सायली अर्जुनला देणार धीर, पाहा मालिकेचा नवीन प्रोमो…

tharala tar mag serial new twist sayli comforts arjun
'ठरलं तर मग' मालिकेचा नवीन प्रोमो पाहिलात का?

‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या सायली अर्जुनला डिनर डेटचं सरप्राईज देणार असल्याचा सीक्वेन्स सुरु आहे. सायलीचं गोड सरप्राईज पाहून अर्जुन भारावून जातो. या डिनर डेटमुळे दोघांचं नातं आणखी बहरत असल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे. पण, अशातच ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये एक नवीन ट्विस्ट येणार आहे. तो म्हणजे अर्जुनचा लहान भाऊ अश्विन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार आहे.

अश्विन हे पात्र सुरुवातीपासूनच सर्वांना समजून घेणारं आणि काहीसं हळव्या स्वरुपाचं दाखवण्यात आलं आहे. हा अश्विन सायलीची नेहमीच मदत करत असतो. एका मुलीने प्रेमात फसवणूक केल्यामुळे तो आत्महत्येचा प्रयत्न करणार आहे. या सगळ्यातून अर्जुन-सायली त्याला सुखरुपपणे वाचवतात परंतु, लहान भावाने एवढं मोठं पाऊल उचलल्यामुळे अर्जुन काहीसा संतापतो. तो सगळ्या मुलांनी दोष देऊ लागतो. संतापलेल्या अर्जुनला पाहून सायली त्याच्याकडे विचारपूस करते.

inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
Ankita lokhande mother reacted on Vicky jain party with girls
लेक घरी नसताना जावयाने गर्ल गँगसह केली पार्टी; अंकिता लोखंडेच्या आई म्हणाल्या, “विकीने त्या सर्वांना…”
tree-cutting_8b16ee
धक्कादायक! पुण्यात होणार २२ हजार झाडांची कत्तल?
Sai Sudarshan to replace Virat Kohli for the two Tests against England
IND vs ENG : विराट कोहलीच्या जागी खेळणार ‘हा’ खेळाडू? आकाश चोप्राने सुचवलेल्या नावावर फक्त शिक्कामोर्तब होणे बाकी

हेही वाचा : आदिनाथ कोठारे चाहत्यांना देणार खास सरप्राईज! पोस्ट शेअर करत म्हणाला, “१ डिसेंबरला…”

सायलीने विचारपूस केल्यावर अर्जुन संतापून तिला “सगळ्या मुली अशाच असतात फक्त फायदा पाहतात एकदा काम झालं की, फसवणूक करून निघून जातात… अश्विनबरोबर सुद्धा हेच झालं.” असं सांगतो. अर्जुनचा राग पाहून सायली त्याचा हात धरते आणि त्याला “सगळ्या मुली सारख्या नसतात…काही मुली खरंच खूप चांगल्या असतात हे तुम्हाला मी नक्की पटवून देईन” असं सांगते आणि धीर देते.

हेही वाचा : Video : ४७ वर्षीय रणदीप हुड्डा गर्लफ्रेंडबरोबर अडकला विवाहबंधनात! मणिपूरमध्ये पारंपरिक पद्धतीने पार पडलं लग्न

सायलीने समजूत घातल्यावर अर्जुन काहीसा शांत होतो. आता “सगळ्या मुली सारख्या नसतात” हे सायली अर्जुनला कसं पटवून देणार हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे. मालिकेचा हा विशेष भाग २ डिसेंबरला प्रसारित करण्यात येणार आहे. दरम्यान, ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेल्या काही महिन्यांपासून टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या स्थानी आहे. आता लवकरच या मालिकेला १ वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यामुळे कलाकार याचं सेलिब्रेशन कसं करतात याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tharala tar mag serial new twist sayli comforts arjun after ashwin attempt to suicide incident happened sva 00

First published on: 30-11-2023 at 10:57 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×