Bigg Boss Marathi Season 5 : शनिवारी (१४ सप्टेंबर) झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर आर्या जाधव हिला घराबाहेर काढण्यात आलं. कॅप्टन्सी टास्कदरम्यान निक्की तांबोळीला कानशिलात लगावल्यामुळे आर्याला ‘बिग बॉस’कडून कठोर शिक्षा देण्यात आली. याचीच सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अनेक जण ‘बिग बॉस’च्या निर्णयाचा निषेध करत आहेत. आजच्या (१५ सप्टेंबर) ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखसह घरातील सदस्य धमाल मस्ती करणार आहेत. याचे व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत.

‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘भाऊच्या धक्क्या’चा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये रितेश देशमुख घरातील सदस्यांबरोबर एक खेळ खेळताना दिसत आहे. यावेळी घरातील सदस्य पहिल्यांदाच अरबाजला बहुमत देताना पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा – “‘निक्की बिग बॉस मराठी’ असं नाव घोषित करा”, आर्याला घराबाहेर काढल्यामुळे लोकप्रिय अभिनेता भडकला, निषेध करत म्हणाला…

या व्हिडीओत रितेश देशमुख म्हणतो, “दोघांबाबत असा प्रश्न आहे की, दोघेही दिसायला बलवान आहेत. पण टास्कमध्ये कोण फुसके बॉम्ब निघाले आहेत. चला…अरबाजसाठी किती जण हात वर करतायत?” तेव्हा कुठल्याही सदस्याने हात वर केला नाही. हे पाहून रितेश देशमुख म्हणाला, “तुम्हाला ऐकू येतंय?” सदस्य म्हणाले, “हो…”

त्यानंतर रितेश म्हणाला की, अच्छा, ऐकू येतंय. मला वाटलं ऐकूच आलं नाही. संग्रामसाठी किती जण हात वर करतायत? यावेळी घरातील सर्व सदस्यांनी हात वर केला. त्यामुळे रितेश म्हणाला, “संग्राम तुम्हाला मॅजिकल काढ्याची गरज आहे.” त्यानंतर अरबाज तो काढा संग्रामला देताना हसत म्हणाला की, भाऊ, मला पहिल्यांदा बहुमत मिळालं. त्यावर रितेश म्हणाला, “आता सरकार स्थापन करा.” हे ऐकल्यावर सर्व सदस्य हसू लागले. तितक्यात पंढरीनाथ कांबळे म्हणाला, “त्यांचं सरकार स्थापन झालंय भाऊ.” मग अरबाजने दिलेला काढा संग्राम पितो. तेव्हा घरातील सदस्य विचारतात, “कसा आहे?” संग्राम म्हणतो, “छान आहे.”

हेही वाचा – ‘ठरलं तर मग’ मालिका बंद होणार की वेळ बदलणार? जुई गडकरी चाहत्यांच्या प्रश्नांचं उत्तर देत म्हणाली…

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, शनिवारी झालेल्या ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेश देशमुखने संग्रामची कानउघडणी केली. रितेश संग्रामला म्हणाला, “तुम्ही ‘बिग बॉस’च्या घरात ‘मिस्टर इंडिया’ आहात. तुम्ही दिसतच नाही आहात. महाराष्ट्राची अपेक्षा होती की या घरात एक वाइल्ड कार्ड यावा, त्यांनी एक अख्खा गेम पलटवून टाकावा. पण या घरात तुम्ही वाइल्ड कार्ड म्हणून आला नाहीत तर माइल्ड कार्ड म्हणून आलेला आहात.”