चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणाऱ्या ९५ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळा काल संपन्न झाला. ऑस्कर २०२३ साठी ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग कॅटेगरीत नामांकन मिळालं होतं. हा पुरस्कार आरआरआरने आपल्या नावावर केला आहे. आता सर्वत्र या चित्रपटाच्या टीमवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कालपासून अनेक जणांनी या गाण्याला ऑस्कर मिळाल्याचा आनंद रील बनवून व्यक्त केला. अशातच भारती सिंहने तिचा मुलगा या गाण्यावर नाचतानाचा एक गोड व्हिडीओ पोस्ट केला आहे.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात भारती सिंहने बाळाला जन्म दिला. तिचा मुलगा लक्ष्य हा आता लोकप्रिय स्टारकेंपैकी एक आहे. अवघ्या ११ महिन्याचा असलेला लक्ष्य त्याच्या निरागसपणामुळे नेहमी सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. आता तो ‘नाटू नाटू’ गाण्याचा आनंद घेताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.

आणखी वाचा : मुकेश व नीता अंबानींनी लेकीच्या जुळ्या मुलांना दिली मोठी भेट, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क

भारतीने लक्ष्यचा व्हिडीओ पोस्ट केला त्यामध्ये ‘नाटू नाटू’ हे गाणं वाजत आहे. तर लक्ष्यला कोणीतरी पकडून उभं केलंय आणि या गाण्यावर तो जागच्या जागी हातवारे करत नाचताना दिसत आहे. त्याचबरोबर हे नाचणं तो खूप एंजॉय करत असल्याचंही त्याच्या चेहऱ्यावरील हास्यातून दिसत आहे. या गाण्यावर नाचणं तो खूप एंजॉय करत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत भारतीने लिहीलं, “जसं गोलाला कळलं की ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ आणि ‘RRR’ला ऑस्कर पुरस्कार मिळाला तो खुशच झाला.”

हेही वाचा : Video: “जय श्री कृष्ण” म्हणताच भारती सिंहच्या लेकाने केलं असं काही की ते पाहून तुम्हालाही वाटेल कौतुक, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता तिने पोस्ट केलेला लेकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. तिच्या व्हिडीओवर कमेंट्स करत तिचे चाहते गोलाबद्दल प्रेम व्यक्त करत आहेत. तसंच त्याचा हा डान्स खूप आवडल्याचंही सांगत आहेत.