अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी १४ डिसेंबरला बॉयफ्रेंड शाहनवाजशी लग्नगाठ बांधली. लग्न सोहळ्याचे फोटो शेअर करत तिने ही बातमी तिच्या चाहत्यांना दिली. मात्र आंतरधर्मीय विवाह केल्यामुळे तिला सर्वत्र ट्रोल केलं जात आहे. आता अशातच लग्नानंतर पहिल्यांदाच एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाली. त्यावेळी तिच्या लूकने सर्वांचंच लक्ष वेधलं.

धर्माने मुस्लीम असलेल्या शाहनवाजशी देवोलिनाने लग्न केलं ते अनेकांना आवडलं नाही. त्यामुळे सध्या ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आहे. तसंच ट्रोलर्सच्या आक्षेपार्ह प्रश्नांना ती सडेतोड उत्तर देता नाही दिसतेय. अशातच ती नुकतीच तिने एका कार्यक्रम सोहळ्याला हजेरी लावली.

आणखी वाचा : “मला स्वतःचं मूल…” लग्नाच्या १९ वर्षांनंतर आयेशा झुल्काने सांगितलं आई न होण्यामागचं कारण

देवोलिना आणि शाहनवाज हे नवविवाहित दांपत्य नुकतंच एका कार्यक्रमात एकत्र दिसलं. यावेळी देवोलिना शहानवाजबद्दल भरभरून बोलली. तिने त्याचा खूप कौतुक केलं आणि ते करत असताना ती खूप लाजतही होती. तिच्या बोलण्यापेक्षा तिच्या लुकने सगळ्यांना आकर्षित केलं.

हेही वाचा : टास्कसाठी काही पण! १५ तास एका जागी उभं राहिलेल्या देवोलिनानं तिथेच केली लघुशंका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी तिने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता, भांगेत कुंकू भरलं होतं, कपाळावर टिकली लावली होती आणि गळ्यात मंगळसूत्रही घातलं होतं. तिच्या या लूकने सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा देवोलिना चर्चेत आली आहे.