बिग बॉस ओटीटी-२ चा विजेता एल्विश यादव गेल्या काही दिवसांपासून त्याच्या अटकेमुळे चर्चेत आहे. सापाच्या विषाचा पुरवठा केल्याप्रकरणी नोएडा पोलिसांनी त्याला पाच दिवसांपूर्वी अटक केली होती. याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. एल्विश यादवला आज (२२ मार्च रोजी) जामीन मंजूर झाला आहे.

रेव्ह पार्टीत सापाचं विष पुरवल्याप्रकरणी रविवारी १७ मार्च रोजी एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी एल्विशला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. एल्विशनं रेव्ह पार्ट्यांमध्ये साप आणि सापाच्या विषाचा पुरवठा केल्याची कबुली दिल्याचं म्हटलं जात होतं, याचदरम्यान आता एल्विशला जामीन मिळाला आहे.

हेही वाचा… “ही तर कारकुनी चूक”, एल्विशविरोधातील ‘तो’ गुन्हा पोलिसांकडून मागे; जामीन मिळणार का?

एल्विशच्या पहिल्या जामीन अर्जावर सुनावणी होऊ शकली नव्हती. मात्र आता वकिलाने दाखल केलेल्या दुसऱ्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने एल्विशचा जामीन मंजूर केला आहे. एल्विशच्या चाहत्यांसाठी ही चांगली बातमी आहे.

नेमके प्रकरण काय?

नोव्हेंबर महिन्यात नोएडा पोलीस आणि वन विभागाच्या पथकाने साप पकडणाऱ्या पाच गारुड्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून पाच कोब्रा आणि काही विष जप्त करण्यात आलं होतं. या आरोपींनी सांगितलं की, ते एल्विश यादवला सापाचं विष पुरवायचे. त्यानंतर एल्विश यादवसह सहा जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणीच त्याला रविवारी पोलिसांनी अटक केली होती. आता पाच दिवसांनंतर त्याला जामीन मंजूर झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.