मराठीमधील तरुण अभिनेत्रींमध्ये ऋता दुर्गुळेचं नाव आवर्जुन घेतलं जातं. ऋताचा इथवरचा प्रवास खरंच कौतुकास्पद आहे. विविध मराठी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत तिने प्रेक्षकांना आपलंस केलं. मराठी मालिकांनी तिला खरी ओळख मिळवून दिली. ‘दुर्वा’, ‘फुलपाखरु’, ‘मन उडू उडू झालं’ अशा मालिकांमध्ये तिने काम केलं. पण मराठी मालिकांच्या कामाबाबत तिने आता नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या ऋता मालिकांपासून दूर आहे. तिचा एक मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. वैभव तत्त्ववादीबरोबर ती ‘सर्किट’ चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटानिमित्त ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ऋताने मराठी मालिकांबाबत भाष्य केलं. तसेच काही गोष्टी बदलण्याची गरज आहे हेही सांगितलं.

आणखी वाचा – Video : नीता अंबानींच्या कार्यक्रमात नवऱ्याच्या एक्स गर्लफ्रेंडला पाहून ऐश्वर्या रायने केलं असं काही की…; व्हिडीओ व्हायरल

काय म्हणाली ऋता दुर्गुळे?

ऋता म्हणाली, “मराठी मालिकांच्या कामाबाबत एक गोष्ट बदलली पाहिजे असं मला मनापासून वाटतं. ती गोष्ट म्हणजे कामाचं नियोजन. मालिकांमध्ये काम करत असताना कलाकाराला १२ तासांची शिफ्ट असते. शिफ्टच्या आधी कलाकाराला अर्धा तास लवकर सेटवर बोलावण्यात येतं. पण तो अर्धातास शिफ्टमध्ये गृहित धरला जात नाही. ही काम करण्याची पद्धत बदलावी असं मला वाटतं. मी माझी पहिली मालिका केली तेव्हा मी १८ वर्षांची होती. माझी पहिला मालिका संपली तेव्हा माझं वय वर्ष २२ होतं. त्यानंतर वयाच्या २७व्या वर्षी माझी दुसरी मालिका संपली. त्यामुळे मालिकांमध्ये काम करण्याची पद्धत माझ्या अगदी डोक्यात आहे”.

आणखी वाचा – “लोकांना असं वाटतं की, आमच्याकडे खूप पैसे आहेत पण…” वनिता खरातचा खुलासा, म्हणाली, “माझे आई-वडील अजूनही…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“१३ तासंच काम करायचं आहे म्हणत कलाकारांना अशावेळी गृहित धरलं जातं. पण मला ही काम करण्याची पद्धत पटत नाही. जेव्हा मी माझ्या दुसऱ्या मालिकेमध्ये काम करत होते तेव्हा माझे १२ तास झाले की, मी सेटवरुन निघून जायचे. त्यासाठी माझं नावही खराब करण्यात आलं असावं. जो या क्षेत्रामध्ये खऱ्या गोष्टींसाठी लढतो त्याचं नाव खराब करण्यात येतं. जे कलाकार बोलतात त्यांचा आवाज दाबला जातो”. ऋताने अगदी स्पष्टपणे तिचं मत मांडलं आहे.