सध्या देशभरात IPL च्या १७ व्या हंगामाची जोरदार चर्चा चालू आहे. लाखो क्रिकेटप्रेमी आयपीएल हंगामादरम्यान आपल्या आवडत्या टीमला सपोर्ट करताना दिसतात. सामान्य लोकांपासून ते अगदी मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकालाच आयपीएलचं आकर्षण असतं. सध्या छोट्या पडद्यावरील अशाच दोन मराठमोळ्या अभिनेत्रींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘मुरांबा’ मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या रमा आणि रेवा अर्थात शिवानी मुंढेकर आणि निशानी बोरुले यांनी नुकतीच भारतीय कर्णधार रोहित शर्माची भेट घेतली. मालिकेच्या व्यग्र शूटिंगमधून वेळ काढत या दोघीही मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंची भेट घेण्यासाठी पोहोचल्या होत्या.

हेही वाचा : शूटिंगच्या सेटवर सई ताम्हणकरला चावलेलं माकड, किस्सा सांगत म्हणाली, “आधी सगळे हसले अन् मग ३-४…”

रमा आणि रेवा यांनी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, पियुष चावला यांची ९ एप्रिल रोजी पहिल्यांदाच भेट घेतली. याचे फोटो शेअर करत शिवानीने “आयपीएल २०२४, मुंबई इंडियन्स, फॅन मुव्हमेंट” असे हॅशटॅग या फोटोवर दिले आहेत. ‘मुरांबा’ मालिकेतील त्यांची सहकलाकार काजल काटेमुळे ही भेट शक्य झाली आहे. काजलचा पती मुंबई इंडियन्सचा फिटनेस कोच म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.

हेही वाचा : Video : ‘गुलाबी साडी’ गाण्यावर खोल समुद्रात डान्स! स्कूबा डायव्हिंग करताना रवी जाधव यांच्या पत्नीचा हटके अंदाज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, छोट्या पडद्यामुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या या अभिनेत्रींना थेट रोहित शर्माला भेट घेण्याची संधी मिळाल्याने अनेकांनी रमा आणि रेवावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही नेटकऱ्यांनी “आमचंही तुमच्यासारखं हिटमॅनला भेटण्याचं स्वप्न आहे” अशा कमेंट्स या अभिनेत्रींच्या फोटोंवर केल्या आहे.