बॉलिवूडमधील स्टारकिड्सची कायमच चर्चा होताना पाहायला मिळते. पण आता मराठी स्टारकिड्सही सातत्याने चर्चेत असतात. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी कायमच प्रसिद्धीझोतात असते. सध्या ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे यांची मुलगी स्वानंदी ही सोशल मीडियावर सक्रीय असते. ती कायमच तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकताच स्वानंदीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबर मजा-मस्ती करताना दिसत आहेत. या व्हिडीओला तिने खास कॅप्शन दिले आहे.
आणखी वाचा : “नवरी तयार…” ‘परश्या’च्या मुंडावळ्या बांधलेल्या फोटोवर मराठी अभिनेत्रीची प्रतिक्रिया, आकाश ठोसर म्हणाला “वरात घेऊन…”
“हा महिना खूपच उत्साही, रोमांचक, साहसी आणि छान होता. त्याचे एकमेव कारण म्हणजे माझे लहानपणीचे मित्र. मला अजून अशाच काही रात्री, विविध ठिकाणं आणि या अशा सुंदर गोष्टींचा आनंद घ्यायचा आहे, त्याची मी प्रतिक्षा करतेय”, असे कॅप्शन तिने या व्हिडीओला दिले आहे.
आणखी वाचा : ‘तू मावा खातोस का?’ विचारणाऱ्याला अभिनय बेर्डेचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाला “मी…”
दरम्यान स्वानंदीने तिच्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत नाटकातून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली. ‘धनंजय माने इथंच राहतात’ या नाटकातून स्वानंदीने रंगभूमीवर पदार्पण केले. त्यानंतर ती ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटात झळकली.