‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमाचे सध्या जगभरात लाखो चाहते आहेत. यामधील प्रत्येक विनोदवीराने सगळ्या प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. हास्यजत्रेमुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. यापैकी घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका निखिल बने. आज यशाच्या शिखरावर असूनही तो भांडुपच्या चाळीत राहतो. अभिनेत्याने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
निखिलने यंदा गावी कोकणात न जाता भांडुपच्या चाळीत होळी साजरी केली आहे. याचा खास व्हिडीओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. निखिल बनेच्या व्हिडीओमध्ये त्याच्या चाहत्यांना ‘खेळे’ या पारंपरिक कोकणी संस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : “त्यावेळी जातीचे रंग…”, कुशल बद्रिकेने सांगितली चाळीतल्या होळीची आठवण; म्हणाला, “फ्लॅट संस्कृतीत…”
अभिनेत्याच्या शेजारच्या सगळेजण मिळून “राधा ही मथुरेच्या बाजाराला चालली…” ही कोकणात गायली जाणारी खास गवळण एकत्र म्हणत त्यावर थिरकत असल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. निखिल दरवर्षी शिमग्याला गावी जातो. परंतु, यावेळी त्याने मुंबईत होळी साजरी केली आहे. “आज मुंबईत भांडुपमध्ये असूनही गावी असल्याचा फिल येतोय” असं कॅप्शन निखिल बनेने या व्हिडीओला दिलं आहे.
हेही वाचा : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेता झाला बाबा; होळीच्या सणाला दिली गुडन्यूज; म्हणाला, “आमच्या आयुष्यात…”
दरम्यान, “भांडुपला म्हणून मिनी कोकण म्हणतात”, “भांडुपची चाळ न सोडण्याचं अजून एक कारण”, “सुंदर परंपरा जपली आहे”, “खूप सुंदर” अशा कमेंट्स निखिलने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी केल्या आहेत.