"तू महाराष्ट्राची हास्यजत्राचा आधारस्तंभ..." समीर चौगुलेने प्रसिद्ध विनोदवीरासाठी केलेली 'ती' पोस्ट चर्चेत | Maharashtrachi Hasyajatra Actor sameer choughule share instagram post for prithvik pratap birthday nrp 97 | Loksatta

“तू महाराष्ट्राची हास्यजत्राचा आधारस्तंभ…” समीर चौगुलेने प्रसिद्ध विनोदवीरासाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत

समीर चौगुलेच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.

“तू महाराष्ट्राची हास्यजत्राचा आधारस्तंभ…” समीर चौगुलेने प्रसिद्ध विनोदवीरासाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
समीर चौगुले पृथ्वीक प्रताप

सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे घराघरात प्रसिद्ध आहेत. या कार्यक्रमातील अनेक विनोदी कलाकारांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला विनोदी कलाकार पृथ्वीक प्रताप याचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते समीर चौगुलेने एक पोस्ट शेअर केली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेला अभिनेते समीर चौगुले हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. ते नेहमी सोशल मीडियावर विविध पोस्ट आणि व्हिडीओ शेअर करताना दिसतात. नुकतंच त्यांनी पृथ्वीक प्रतापच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी पृथ्वीकचा एक फोटो शेअर केला आहे. त्या बरोबर त्यांनी त्याला हटके कॅप्शनही दिले आहे.
आणखी वाचा : “आपण जे बघतो त्यावर…” मानसी नाईकच्या गंभीर आरोपांवर पतीचे सडेतोड उत्तर

समीर चौगुलेची इन्स्टाग्राम पोस्ट

“मित्रा पृथ्वीक..वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा… आमच्या हास्यजत्रेचा ऑलराऊंडर…याच्या अभिनय क्षमतेचा थांगच लागत नाही… त्यालाही आणि आम्हालाही…प्रचंड मेहनती नट… सतत वेगळा प्रयत्न करण्याची याची वृत्ती मला खूप काही शिकवून जाते.. पृथ्वीक अत्यंत कमी वेळात महाराष्ट्राची हास्यजत्राचा आधारस्तंभ झाला आहेस, याचा मला खूप अभिमान आहे…. शीतली आणि शंकऱ्या या प्रहसनातील त्याचा शंकऱ्या मला प्रत्येक सादरीकरणानंतर अचंबित करून जातो… प्रत्येक सादरीकरण हे उत्तमच व्हावं हा तुझा हट्टच तुला आभाळा एवढं मोठं करणार मित्रा… तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेममित्रा पृथ्वीक..वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..”, असे समीर चौगुलेने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

समीरने केलेल्या पोस्टवर पृथ्वीकनेही कमेंट केली आहे. यात त्याने ‘लव्ह यू समीर दादा’ असे म्हटले आहे. त्याबरोबर समीर चौगुलेच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा : “जाड्या म्हशीसारखी दिसणारी मी…” ‘गीता माँ’ स्पष्टच बोलली

दरम्यान अभिनेता पृथ्वीक प्रताप याने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात विनोदी पात्र साकारताना दिसत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ’83’ चित्रपटातही त्याने काम केले होते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 19:14 IST
Next Story
हार्दिक जोशी व अक्षया देवधरची लगीनघाई, तर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याचा विवाहसोहळा संपन्न, फोटो व्हायरल