आयपीएलच्या १६व्या हंगामातील अंतिम सामना सोमवारी(२९ मे) पार पडला. गुजरात टायटन्स व चेन्नई सुपर किंग्जमध्ये रंगतदार सामना पाहायला मिळाला. या सामन्यात विजय मिळवत चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरलं. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पाचव्यांदा ट्रॉफी जिंकल्यानंतर चेन्नईच्या चाहत्यांकडून आनंद व्यक्त केला जात आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेनेही गुजरात टायटन्स व चेन्नई सुपर किंग्जमध्ये रंगलेला आयपीएलचा अंतिम सामना पाहिला. याबाबत गौरवने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. गौरव काही कामानिमित्त सध्या लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये त्याने गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जचा सामना पाहिला. याचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.




हेही वाचा>> ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…
गौरवने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तो टीव्हीवर आयपीएलचा अंतिम सामना पाहताना दिसत आहे. “लंडनमध्ये बघतोय,” असं कॅप्शन त्याने स्टोरीला दिलं आहे. गौरवने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये आयपीएलच्या अंतिम सामन्यातील चेन्नई सुपर किंग्जच्या विजयाचा क्षण दिसत आहे.

आयपीएलचा अंतिम सामना रविवारी(२८ मे) पार पडणार होता. परंतु, पावसामुळे हा सामना राखीव दिवशी म्हणजेच २९ मेला खेळवला गेला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ४ गडी गमावून २१४ धावा केल्या. यानंतर पावसामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार चेन्नईला १५ षटकांत १७१ धावांचे लक्ष्य मिळाले. रवींद्र जडेजाने मोहित शर्माच्या शेवटच्या षटकातील दोन चेंडूवर षटकार आणि चौकार मारत रोमहर्षक विजय मिळवला.