‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले. अभिनेता ओंकार राऊत आणि अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हेदेखील या कार्यक्रमामुळे लोकप्रिय झाले. ते दोघेही रिलेशनमध्ये असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र त्या दोघांनीही यावर स्पष्टीकरण देत ते एकमेकांचे मित्र असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर आता ओंकारच्या एका पोस्टवर प्रियदर्शनीने केलेल्या कमेंटने लक्ष वेधून घेतले आहे.

ओंकार राऊतने नुकतीच नवी कोरी कार खरेदी केली आहे. ओंकारने मारुती सुझुकी कंपीनीची बलेनो ही गाडी घरी आणली आहे. त्याने त्याच्या गाडीचे काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोबरोबरच त्याने नव्या गाडीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
आणखी वाचा : “ज्या पद्धतीने ओमकार तुझ्याकडे पाहतोय…” आस्ताद काळेच्या कमेंटने वेधलं लक्ष, ‘हास्यजत्रे’तील अभिनेत्री म्हणाली “काय तुम्ही…”

ओंकारने ही नवी गाडी खरेदी केल्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाच्या अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. ओंकारच्या या फोटोवर अभिनेता निखिल बनेने “अभिनंदन राऊत ( स्मगलिंग करतोय.. मग मोठ्याने बोल ना.)”, अशी मजेशीर कमेंट केली आहे.

तर गौरव मोरेने या पोस्टवर “अभिनंदन बच्ची” असे म्हणत हार्ट इमोजी शेअर केले आहेत. त्याबरोबरच अभिनेत्री ईशा केसकर, सुयश टिळक, प्रसाद ओक या कलाकारांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
आणखी वाचा : “माझ्या आयुष्यात…” ओंकार राऊतबरोबरच्या ‘त्या’ फोटोवर प्रियदर्शनी इंदलकरची प्रतिक्रिया

Priyadarshani Indalkar comment
प्रियदर्शनी इंदलकरची कमेंट

ओंकारने नवीन गाडी खरेदी केल्याच्या या पोस्टवर प्रियदर्शनी इंदलकरनेही कमेंट केली आहे. तिने या फोटोवर “कॅप्शन” असे म्हणत हार्ट इमोजी पोस्ट केला आहे. त्यावर ओंकारने हार्ट इमोजी शेअर करत “धन्यवाद” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : “…आणि त्याने मला किस केलं” रसिका सुनीलचे वक्तव्य चर्चेत, म्हणाली “माझ्या नवऱ्याला…”

दरम्यान ओंकारच्या या गाडीचं सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसाशी खास कनेक्शन आहे. “२४/४/२०२३ला नवी baleno घरी आली,” असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. ओंकारने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘काळे धंदे’ या वेब सीरिजमध्येही ओंकार झळकला होता.