अभिनेता प्रसाद खांडेकर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे नावारुपाला आला. या कार्यक्रमामुळेच त्याच्या चाहत्यावर्गामध्ये प्रचंड वाढ झाली. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बरोबरच प्रसाद आता मराठी चित्रपटांमध्येही रमला आहे. ‘एकदा येऊन तर बघा…रिटर्न जाणारच नाही’ या चित्रपटाचं तो दिग्दर्शन करत आहे. पण आपल्या कामामधून मिळालेल्या वेळेमध्ये तो कुटुंबाला अधिकाधिक वेळ देताना दिसतो. आता प्रसादने लेक व पत्नीसह डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडिया अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – “आमच्या दोघांमध्ये फक्त श्वासाचं अंतर होतं अन्…” स्वप्निल जोशीसह इंटिमेट सीन करण्याबाबत शिल्पा तुळसकरचं वक्तव्य

प्रसादने बालदिनानिमित्त एक खास व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ‘इतनी सी हसीं’ या गाण्यावर प्रसाद डान्स करत आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “स्वतःमधील बाळ जपायला हवं. श्लोकच्या आग्रहाखातर त्याच्या मागील वाढदिवसाला मी व अल्पाने त्याच्यासह डान्स केला. नकळत त्याची प्रॅक्टिस करताना श्लोकबरोबर मी व अल्पा दोघांनीही पुन्हा एकदा बालपण अनुभवलं. कार्यक्रमाला डान्स करताना किंवा स्किट, नाटक करताना जेवढं प्रेशर वाटतं तेवढंच प्रेशर हा डान्स करताना पण वाटत होतं.”

प्रसादला यावेळी त्याच्या बालपणाची आठवण झाली. त्याचा हा गोड व्हिडीओ पाहून नम्रता संभेरावला कमेंट करायला मोह आवरला नाही. तिने कमेंटच्या माध्यमातूनच तिची पोलखोल केली. प्रसादला घरी कोणत्या नावाने हाक मारतात हे तिने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नम्रता म्हणाली, “तू कामामध्ये असलास तरी तुझ्या कुटुंबाला पूर्ण वेळ देतोस. जे काही करतोस ते त्यांना खूश ठेवण्यासाठी करतोस. इतका मोठा होऊनही आई तुला बाबू म्हणते. त्या बाबुलासुद्धा बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.” म्हणजेच प्रसादच्या आईसाठी तो अजूनही तिचा बाबूच आहे हे नम्रताने सांगितलं.