मराठी सिनेसृष्टीतील धडाकेबाज सुपरस्टार अशी ख्याती असणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणजे महेश कोठारे. गेली अनेक दशक होते त्यांच्या कलाकृती मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. निर्मिती असो, दिग्दर्शन असो अथवा अभिनय त्यांच्या कामाचं नेहमीच प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. गेली काही वर्ष ते निर्मिती आणि दिग्दर्शनात व्यग्र असताना आता ते मालिकेमध्ये अभिनय करताना दिसणार का यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सध्या सर्वत्र ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याची चर्चा आहे. यावर्षी या पुरस्काराचे टॅगलाईन आहे ‘चर्चा रंगणार बातमी गाजणार.’ आज हा सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. तर महेश कोठारे देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी ‘सेलिब्रेटी कट्टा’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी त्यांचे मालिकेबद्दलचे प्लॅन्स सांगितले आहेत.

आणखी वाचा : “त्या काळी आमच्यात स्पर्धा होती पण…,” सचिन पिळगांवकरांनी उलगडलं महेश कोठारेंबरोबरचं नातं

“महेश कोठारे मालिकेत काम करताना दिसणार का?” असा प्रश्न विचारला गेल्यावर ते हसत हसत म्हणाले, “नाही मी मालिकेत अभिनय करणार नाही. पण येत्या काळात मी मालिकेची निर्मिती करणार आहे. त्याचबरोबर एखाद्या मालिकेचं दिग्दर्शनही करेन.”

हेही वाचा : Video: अखेर प्रतीक्षा संपली! सचिन व सुप्रिया पिळगावकर अनेक वर्षांनी एकत्र थिरकणार, ‘झी चित्र गौरव’तील व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान महेश कोठारे गेल्या काही वर्षात अभिनेते म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले नाहीत. २०१३ मध्ये ‘झपाटलेला २’ या चित्रपटामध्ये त्यांनी कमिशनर महेश जाधव ही भूमिका साकारली होती. तर त्यानंतर ते निर्माते म्हणूनच प्रेक्षकांच्या भेटीला येऊ लागले. त्यांच्या निर्मिती संस्थेमार्फत त्यांनी दरम्यानच्या काळात अनेक उत्तमोत्तम मालिकांची निर्मिती केली.